नागपूर - यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याच्या हालचालींना गती मिळत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मार्गदर्शक सूचनेनुसार त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य देत, राज्यातील मूर्तिकार आणि सामाजिक संघटना यासंदर्भात सक्रियपणे पावले उचलत आहेत.