

“Tragic Deaths at Sub-District Hospital: Pregnant Mother and Two Kids Lose Lives”
Sakal
अचलपूर, (जि. अमरावती): मेळघाटच्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १५) एकाच दिवशी दोन बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तर तिसरा बालक सुटी झाल्यावर घरी जात असताना दगावल्याची घटना घडली. या मृत्यूने धारणी उपजिल्हा रुग्णालय हादरले असून गर्भवती मातेचा नेमका मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा मृत्यूचे नेमके खरे कारण कोणते हे सांगण्यास तयार नाहीत. त्यामुळे मेळघाटच्या आरोग्य विभागात काय चाललंय, असा प्रश्न विचारला जात आहे.