
नागपूर : मनाच्या वाटा भूलभुलय्यासारख्या आपल्याला भुलवत असतात. "मन उमगत नाही' असे नाही. आपण समजून घेतल्यास उमजते, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. निमित्त होते, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित "चालता-बोलता वार्षिकांक'च्या सादरीकरणाचे.
ब्रेकिंग - आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध
"मन मनास उमजत नाही' या विषयावर बोलताना डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी मनाचे विविध पापुद्रे हळुवारपणे उलगडले. त्या म्हणाल्या की, मन म्हणजे नेमके काय? आपले विचार, वागणे, भावना हे सारेच मनाशी निगडित आहेत. मन जसे यशाने, आनंदाने बहरून येते, तसे ते अपयशाने, दुःखाने कोमेजून जाते.
मात्र, आपण आधीच पुढील गोष्टी स्वीकारण्याची मनाची तयारी केली तर यश-अपयश, सुख-दुःख यांचा आपल्याला सहज स्वीकार करता येतो. आपले मनही चुका करत असते. एखादी गोष्ट मनात किती वेळ ठेवावी, हे आपणच ठरवायचे. पृथ्वीच्या गोलाचा फक्त नजरेसमोरील भाग तेवढा आपल्याला दिसतो. तशी मनाचीही एकच बाजू आपल्याला दिसत असते. तेवढ्याच बाजूचा आपण विचार करतो. पण, त्यापलीकडे असलेले सुप्त मनही आपल्याला खुणावत असते.
चालता-बोलता वार्षिकांकाचे मुखपृष्ठ ऐश्वर्या दोषी हिने नृत्याने सजविले. अंकाचे संपादन अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी केले. या अंकामध्ये अभय नवाथे, डॉ. अंजली पारनंदीवार यांच्या कविता, तर सुषमा मुलमुले यांची "पाठलाग' ही प्रेमकथा आहे. वीणा कुलकर्णी यांनी संतांच्या रचनांमधील मनाचे दाखले देत अंकाचे शेवटचे पान उघडले. अंकाची सूत्रे स्वाती सुरंगळीकर यांनी सांभाळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.