नागपूर विद्यापीठाने घडविले उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur University

नागपूर विद्यापीठाने घडविले उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या विद्यापीठाने देशाला उपराष्ट्रपती, पंतप्रधान ते सरन्यायाधीश दिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात १९२३ साली विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या अलीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्या काळी प्रवेश देत विद्यापीठाने स्वातंत्र्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली होती.

भारताचे सहावे उपराष्ट्रपती व देशाचे पहिले मुस्लिम मुख्य न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला, पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर विद्यापीठात शिक्षण घेतले. याशिवाय अनेक मातब्बर राजकारणी, नेते, न्यायाधीश वकील, सामाजिक कार्यकर्ते व कलावंत विद्यापीठाने घडविले आहेत. विद्यापीठातून अनेक विद्यार्थ्यांनी देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक पातळीवर नाव कमावले आहे.

इतर विद्यापीठातही डंका

विद्येचे माहेरघर हे पुणे असले तरी, प्रत्यक्षात ज्ञानाचे स्त्रोत म्हणून नागपूर विद्यापीठाकडे पाहिल्या जाते. राज्यातील असे एखादे विद्यापीठ असेल जिथे नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक कुलगुरू म्हणून गेले नसावे. आतापर्यंत जवळपास दहा ते बारा प्राध्यापकांनी तो मान पटकाविला आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी कुलगुरू एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर, डॉ. राजन वेळूकर, डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. शशीकला वंजारी, दिवंगत डॉ. कृष्णकुमार, डॉ. सुधीर मेश्राम यांच्या समावेश आहे. सध्या डॉ. प्रमोद येवले हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. उज्ज्वला चक्रदेव या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी आणि नव्याने स्थापन झालेल्या स्कील युनिर्व्हसिटीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचाही समावेश आहे.

Web Title: Prime Minister Vice President Chief Justice Educated From Nagpur University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..