esakal | अखेर त्याला काळानेच दिली शिक्षा; मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याचा कोरोनाने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्यू

अखेर त्याला काळानेच दिली शिक्षा; मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याचा कोरोनाने मृत्यू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नागपूर ः मुंबईत २००६ मध्ये रेल्वेच्या डब्यात प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणत १८९ जणांचे बळी घेतल्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला काळानेच शिक्षा दिली. त्याला कोरोनाची बाधा झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमाल मोहम्मद अन्सारी (५०, बिहार) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

हेही वाचा: विदर्भाच्या वाट्याला सर्वात कमी निधी ; महा कृषी ऊर्जा धोरणात पीछेहाट!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल अन्सारी हा याला ताप आल्यानंतर ९ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच ८ एप्रिलला मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

रिपोर्ट येण्यापूर्वीच कमाल अन्सारीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात तो कोरोना बाधित निघाला होता. पहिल्या दिवशी ८ कैदी कोरोनाबाधित निघाले होते. नंतर ती संख्या १३ वर पोहचली. यामध्ये दोन फाशीच्या शिक्षेच्या कैद्यांचा समावेश होता.

हेही वाचा: १० कोटींची इस्पितळाची जंबो इमारत बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर धुळखात; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

कमाल अन्सारी याने जुलै २००६ मध्ये लष्कर ए-तोयबाने सीमीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मुंबईत रेल्वे साखळी बॉम्बस्फोट घडविले होते. यामध्ये १८९ जण मृत पावले होते तर तब्बल ८०० जण जखमी झाले होते. या प्रकरणात १२ पैकी पाच जणांंना फाशीची शिक्षा झाली होती. त्यामध्ये कमाल अन्सारी हा मुख्य आरोपी होता.