Priya Fuke: फसवून लग्न लावलं, मारायला माणसं पाठवली..! परिणय फुकेंच्या भावजयीचे सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

Priya Fuke: हुंडाबळीची पीडिता वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमधील महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या समोर यायला लागल्या आहेत.
Priya Fuke
Priya Fuke
Updated on

Priya Fuke: हुंडाबळीची पीडिता वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमधील महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या समोर यायला लागल्या आहेत. त्यानुसार, भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत आपल्यावर सासरच्या मंडळींनी अर्थात फुके कुटुंबियांनी केलेल्या अन्याय-अत्याचाराचा पाढा वाचला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे या दोघीही या पत्रकार परिषदेला उपस्थितीत होत्या. आपण गेल्या दीड वर्षापासून लढतो आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही आपण यासंदर्भात भेटी घेतल्या पण याचा काहीही उपयोग झाला नाही, असं त्यांनी सांगितलं.

Priya Fuke
USA Student Visa Issue: सोशल मीडिया व्हेटिंग म्हणजे काय? ज्यासाठी अमेरिकेनं सर्व विद्यार्थी व्हिसा मुलाखती थांबवल्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com