मिरवणुका झाल्या रद्द आणि बुडाला ‘त्यांचा’ रोजगार, गुलालाची बाजारपेठ झाली बेरंग

file
file

कळमेश्वर (जि.नागपूर) : पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या शहरात यंदा गणेशोत्सव साधेपणानेच होणार आहे़. परिणामी गणेशोत्सवावर आधारित व्यवसाय आणि रोजगार पूर्ण बंद आहेत. यामुळे मोठी आर्थिक उलाढाल थांबली आहे़. मानाच्या गणपतींसह विविध तालीम संघाकडून स्थापना होणाऱ्या मूर्ती दरवर्षी आकर्षण ठरतात. या मंडळांच्या स्वागत आणि विसर्जन मिरवणुका नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. परंतू, यंदा मिरवणुका निघणार नसल्याने उत्सवासाठी केली जाणारी रंगीत तालीम बंद आहे.  या पार्श्वभूमीवर शहरातील बँडपथक आणि ढोलताशा वादकांसोबत संपर्क केला असता मार्च महिन्यापासून एकही बुकिंग नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

...आणि सुरू केला दुसराच उद्योग
 बऱ्याच कलांवंताना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. वाजंत्रीच्या एका चमूत १७ ते१८ लोकांचा सहभाग असतो. परंतू यंदा उत्सवच नसल्याने वादकांचे हाल होत आहेत. यात प्रामुख्याने बँड व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. बऱ्याच जणांकडे गेल्या वर्षापासून बुकिंग होते, तेही रद्द करावे लागले. मार्चपासून काहीही काम नसल्याने बँडमध्ये विविध वाद्ये वाजविण्याऱ्यांनी भाजीपाला विक्री, हमाली आणि इतर व्यवसाय सुरू केले आहेत. या वादकांची गणेशोत्सवावर मोठी भिस्त होती़.
गणेशोत्सव काळात मंडप आणि लायटींग लावून बाप्पाच्या पेंडॉलला अधिकाधिक आकर्षक करणाऱ्या मंडप व्यावसायिकांनाही यंदा मोठा फटका बसला आहे. सर्वच मंडळांकडे पेंडॉल उपलब्ध असतात.. त्याची देखभाल करण्याचे कामही करण्यात येत होते.

यंदा एकही ऑर्डर नाही
शहरात अनेक व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडे मंडप, लायटिंगची साधने आहेत. यात साउंड सिस्टीमही पुरवण्याचे काम हे व्यावसायिक करतात.  मोठ्या व्यावसायिकांकडे किमान १०० पेक्षा अधिक तर छोट्या मंडपवाल्यांकडे १० ते३० जण कामाला होते. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या सर्वांनाच सुटी देण्यात आली़. बहुतांश कामगार हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांनी तेथेच शेतात काम करणे पसंत केले़. उर्वरीत भाजीविक्री व इतर कामे करीत असल्याची माहिती आहे़.  तूर्तास मंडपमालक आणि एखादा दुसरा कामगार अशीच स्थिती आहे़.  साधारण गणेशोत्सव काळात मोठ्या व्यावसायिकांना मोठ्या मंडळांकडून तीन लाखापर्यंत तर छोटया व्यावसायिकांना दीड लाख रुपये मिळत होते. यंदा हे सर्वच थांबले असल्याची माहिती त्यांनी दिली़.  मंडप मालकांकडे आजअखेरीस एकही ऑर्डर नसल्याचे दिसून येते.

डिजेवाले बाबूही शांतच
बाप्पाच्या आगमनाची मोठी उत्सुकता असलेली युवक मंडळे पारंपरिक वाद्यांपेक्षा डिजेला प्राधान्य देतात़. निर्धारित डेसिबलमध्ये मिरवणूकीत डिजे लावण्याची परवानगी मिळते. यातून शहरातील गणपती बाप्पांच्या स्वागत मिरवणूकी डिजेही लक्षवेधी ठरतो़. यंदा मिरवणुका नसल्याने डिजेवाले व्यावसायिक शांत बसून आहेत.

गुलालाची बाजारपेठ शांत
पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या बाप्पाच्या मिरवणूकांमध्ये ढोलताशे आणि लेझिम नृत्य येवढे आकर्षक असते, तेवढेच आकर्षण हे उधळण्यात येणाऱ्या गुलालाचे असते. स्वागत मिरवणूकांपासून ते थेट अनंत चर्तुदर्शीनंतरचे १० दिवस शहराचे रस्ते गुलालाने माखलेले असतात. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुलालाच्या उधळणीसाठी मंडळांकडून स्वतंत्रपणे गुलाल खरेदीचा बजेट केला जातो़. मात्र, यंदा हा गुलालही अत्यंत कमी प्रमाणात खरेदी केला गेल्याचे बोलले जात आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com