Nagpur : प्रा. साईबाबांची सुटका, साथीदार महेश तिरकी मात्र कारागृहातच

पाच सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्त केले
Nagpur
Nagpur esakal

नागपूर : बेकायदा कारवाई (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) दोषी ठरविलेले प्रा. जी. एन. साईबाबांसह पाच सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्त केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. मात्र, त्यांचा साथीदार महेश करीमन तिरकी (वय २२, रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) याचा आदेश न आल्याने त्याची सुटका झाली नाही.

Nagpur
Makeup Tips : मेकअप करूनही चेहरा निस्तेज दिसतो? मग, फॉलो करा 'हे' आय मेकअप लूक्स

गडचिरोली सत्र न्यायालयाने प्रा. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, यूएपीए कायद्याच्या तरतुदींचे पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा जन्मठेप सुनावण्याचा निर्णय नुकताच रद्द केला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष सुनावणी झाली. ऑगस्ट २०१३ मध्ये गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा याला अहेरी येथून महेश तिर्की आणि पांडू नरोटे यांच्यासह अटक केली होती.

Nagpur
Women Fashion Tips : अवनीत कौरचे हे कुर्ती डिझाइन ऑफिससाठी आहेत बेस्ट, दिसाल सुंदर

नक्षलवादी नेते गणपती, नर्मदा अक्का आणि प्रा. साईबाबा यांच्यात मध्यस्थी केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रा. साईबाबांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी जन्मठेप सुनावली होती.

Nagpur
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. या आदेशानुसार यासाठी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझेस यांचे न्यायपीठ गठित करण्यात आले. २३ जून २०२३ पासून यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. तर, २४ सप्टेंबर २०२३ रोजी नियमित सुनावणीचा निर्णय घेतला. त्यामुळे, प्रा. साईबाबा यांच्यासह महेश तिरकी, पांडू नरोटे, हेम मिश्रा, प्रशांत राही व विजय तिर्की यांच्या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता.

न्यायपीठासमक्ष मंगळवारी व्हर्च्युअल सुनावणी घेत न्यायालयाने पाचही आरोपींना तांत्रिक कारणांच्या आधारे निर्दोष मुक्त केले. त्यानुसार बुधवारी (ता.६) त्यांना सोडण्यात येणार होते. मात्र, न्यायालयाचा आदेश न आल्याने त्यांना सोडण्यात आले नाही. गुरुवारी सकाळी आदेशाची प्रत येताच त्यांना कारागृह अधीक्षकांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि काही समर्थक कारागृहाबाहेर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com