Vidhan Parishad Nivadnuk : परवानाप्राप्त शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध; निवडणूक कालावधीत गैरवापर होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gun

Vidhan Parishad Nivadnuk : परवानाप्राप्त शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध

नागपूर : आगामी विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council election) लक्षात घेता आचारसंहिता (Code of Conduct) आणि निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत परवानाधारक शस्त्रे, हत्यार, दारूगोळ्याचा (weapons) गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे सोबत बाळगण्यास नागपूर पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे.

सध्या विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १० डिसेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकूण १५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी नागपूर शहर पोलिस विभागाच्या कार्यक्षेक्षात एकूण ५ तसेच नागपूर ग्रामीणच्या हद्दीत १० मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेत मनपाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व इतर प्राधिकरणाचे प्रतिनिधी मिळून ५५६ मतदार मतदान करणार आहेत. नागपूर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत फक्त ३०० मतदार हे ५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. निवडणूक नि:पक्ष निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे.

हेही वाचा: हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथचे सेक्सी पोझ बघितले का?

निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारूगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जिवीत हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा, हत्यारांचा, दारूगोळ्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परवान्यावरील शस्त्रे, अग्निशस्त्रे सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास तसेच सोबत कुठेही नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे यांनी नुकतेच आदेशही जारी केले आहेत.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना सूट

सामान्यांना १६ डिसेंबर २०२१ पर्यंत स्वत: जवळ परवानाप्राप्त अग्निशस्त्रे बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळून इतरांना प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

loading image
go to top