esakal | तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा; उपराजधानी सज्ज, तब्बल एवढे सार्वजनिक मंडळ
sakal

बोलून बातमी शोधा

Public Ganeshotsav at 904 places in Nagpur, tight Police security

२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान घरोघरी गणेशोत्सव साजरा होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत परिमंडळ निहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा; उपराजधानी सज्ज, तब्बल एवढे सार्वजनिक मंडळ

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर :  उपराजधानी लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने गणोशेत्स साजरा केला जाणार आहे. शहरातीत ९०४ सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार आहे. अप्रिय घटनांना आळा घालून गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी शहर पोलिस दल सज्ज झाले आहे. शहरात बाराशेहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला राज्य राखीव दल, शिघ्रकृती दल, दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहेत.

२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान घरोघरी गणेशोत्सव साजरा होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत परिमंडळ निहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५ पोलिस उपायुक्त, १० सहायक पोलिस आयुक्त, ३७ पोलिस निरीक्षक, २५ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ४१४ पुरुष कर्मचारी व ११८ महिला कर्मचारी, ५६७ पुरुष व महिला होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहे. 

जाणून घ्या - केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा
 

राज्य राखीव पोलिस दलाच्या १४ कंपन्या, ४ दंगा नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथे ३ दंगा नियंत्रण पथके, राज्य राखीव पोलिस दलाच्या ४ कंपन्या आणि शिघ्रकृती दलाचे पथक राखीव ठेवण्यात आले आहे. सोबतच विशेष शाखेचा कर्मचारी साध्या वेषात तैनात राहतील. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीही संपूर्ण शहरात वाहतूक पोलिस तैनात असतील. संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी नियमीत गस्त घालून सार्वजनिक मंडळांना भेटी देतील. चितारओळ, कॉटन मार्केट, गणेश टेकडी आदी गणेश मुर्ती विकच्या ठिकाण विशेष बंदोबस्त राहील. सवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट राहणार असून गर्दीच्या ठिकाणी नियमित पोलिस गस्त राहील.
 
 

नागरिकांना आवाहन


देशात ‘कोविड -१९‘ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थीतीचा विचार करता गणेशोत्सवा दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनातर्फे निर्गमित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, नागरींकांनी गणेश आगमन व विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीत जाणे टाळुन स्वतःच्या व कुंटुबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडाला मास्क लावावा, सॅनीटायझरचा वापर करावा तसेच सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्याता आहे आहे.  

संपादन : अतुल मांगे

loading image
go to top