नागपूर - बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीत ‘आयएएस’ अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, आता पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.