

Christmas Warmth Reaches NICU as Purple Santa Spreads Joy
sakal
नागपूर: जन्मत:च कमी वजनाचे बाळ. एक-दोन नव्हेतर सुमारे पन्नास बाळ उपचारार्थ असतात. प्रत्येक श्वासासाठी ही बालकं झुंज देत असतात. यांच्या उपचारासाठी डॉक्टर, सेवासुश्रूषेसाठी परिचारिका, तर बाहेर नाजूक जीवाची चिंता करणारे आई-वडील. या साऱ्या भावनांचा साक्षीदार असलेला नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग. संवेदनशील वातावरणात मेडिकलमधील परिचारिकांच्या पथकाने नवजात शिंशूना पर्पल सांताक्लॉजचे अनोखे रूप देऊन ख्रिसमस साजरा केला.