esakal | कोरोना वाढतोय तरी तोंडाला नाही मास्क, नागपूर विभागातील प्रवासी बिनधास्त

बोलून बातमी शोधा

mask
कोरोना वाढतोय तरी तोंडाला नाही मास्क, नागपूर विभागातील प्रवासी बिनधास्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाविरोधातील लढ्यात मास्क, सॅनिटायझर व डिस्टंन्सिंग आवश्यक आहे. मात्र, नागपूर विभागातील रेल्वे प्रवासी मात्र मास्क लावण्याबाबत उदासीन असल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नागपूरकरांच्या तुलनेत मुंबईकर व पुणेकर मास्क लावण्याबाबत गंभीर असल्याचे त्यात दिसते.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

रेल्वेस्थानक किंवा रेल्वे प्रवासादरम्यान मास्क न लावणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम मध्य रेल्वेने आरंभली आहे. त्या अंतर्गत रेल्वेस्थानक किंवा रेल्वे प्रवासादरम्यान मास्क न लावणाऱ्या प्रवाशांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या धडक मोहिमेंतर्गत १७ ते २५ एप्रिल दरम्यान मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये एकूण ८७८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागातील सर्वाधिक ३११ प्रवाशांवर कारवाई करीत ४९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्या खालोखाल नागपूर विभागाचा क्रमांक लागतो. नागपूर विभागांतर्गत २६७ प्रवाशांवर कारवाई करीत ६२ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची ही बेफिकीरी संसर्गाच्या विस्फोटाचेही कारण ठरू शकते.

विभागनिहाय कारवाई -

विभाग प्रवासी संख्या

  • भुसावळ ३११

  • नागपूर २६७

  • मुंबई १७०

  • सोलापूर ६७

  • पुणे ६३