‘या’ जिल्ह्यात पावसामुळे झाली १९९४ची पुनर्रावृत्ती, वाचा काय झाले असावे...

कामठीःपुरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढताना बचाव पथक.
कामठीःपुरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढताना बचाव पथक.
Updated on

नागपूर ग्रामीणः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागाला `धोधो’ धुवून काढले.  सर्वत्र नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले असून कामठी, पारशिवनी, सावनेर, नरखेड, मौदा तालुक्यातील बहुतांश गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.कन्हान नदीकाठावरील गावांना पूराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सावनेर तालुक्यात एक महिला पूरा वाहून गेली. रामटेक तालुक्यात मासे पकडायला गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.अनेक घरे पाण्याखाली आली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  १९९४ यावर्षी आलेल्या महापूराची  पुनर्रावृत्ती झाल्याचे काही जाणकारांनी सांगितले.

पेंच नदीचे रौद्र रूप
पारशिवनीः पेंच नदीने रौद्र रुप धारण केले. पारशिवनी शहराचा अनेक गावांशी असलेला संपर्क तुटला तर पेंच धरणात पाण्याचा साठा वाढल्याने धरणाचे दरवाजे तीन फुटापर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे पेंच नदी काठोकाठ भरुन वाहू लागल्याने नदी काठावरील गावे पाण्याखाली आली आहेत. अनेक घरांत पाणी घुसले. नदीकाठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली आली. शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले.  नयाकुड फुलांवरुन तीन फुट पाणी वाहत होते. त्यामुळे पारशिवनी रामटेक मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने इतर गावाशी नागरिकांचा संपर्क तुटला होता.  खापा व साहैली येथील नदी ‘ओव्हरफ्लो’  झाली असल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.पेंच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आला होता. अनेक गावांतील लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गावांना खाली करण्यात आले. नदीकाठावरील अनेक गावांत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुलावरुन होणारे वाहनांचे आवागमण प्रशासनाने पूर्णपणे बंद केले आहे, तर लहान मोठे नदी नालेही तुडुंब भरुन वाहत असल्याने नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. प्रति सेकंद ३४४८.१६ क्ययुमेप  पाणी पेच धरणातून नदीत सोडले जात आहे. तोतलाडोह व चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग सतत होत राहिल्यास पेंच धरणात जर साठा अधिक झाल्यास धरणाचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे पेंच नदी अधिक रौद्ररूप धारण करु शकते.

 अधिक वाचाःबेसबाॅलच्या दंड्याने केलेल्या मारहाणीत अखेर युवकाचा मृत्यू


ओपन कास्ट कोळसा खाणीत शिरले पुराचे पाणी
खापरखेडाः भानेगाव ओपन कास्ट कोळसा खदानीत शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कन्हान नदीच्या महापुराचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकार शासनकृत ओपन कास्ट कोळसा खदान असून येथील पावसाच्या पाण्यामुळे उत्पादन बंद असते. या ओपनकास्ट कोळसा खाणीत उत्पादनाच्या ठिकाणी अंदर जवळपास २० ते २५कर्मचारी काम करतात, तर वरच्या ठिकाणी जवळपास अंदाजे दीडशे ते पावणेदोनशे कर्मचारी काम करतात. ओपन कास्ट कोळसा खान असल्याने कोळसा उत्पादन बंद होते. मात्र स्टॉक असलेला कोळसा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असते. आज रात्री पहाटे साडेपाचच्या सुमारास ओपन कास्ट कोळसा खानीत  नदीच्या पुराच्या पाण्याने खदानीचा रॅम्प फुटला दरम्यान खदानीत ओपन कास्ट उत्पादनस्थळी पाच ते सहा पंप खलाशी पदाचे कर्मचारी काम करीत होते. मात्र सतर्कता असल्याने काम करणारे खलाशी खदानीच्या वर आले, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, हे विशेष. एकीकडे पावसाळ्यामध्ये अधिकांश ओपन कास्ट कोळसा खदानीमध्ये कोळसा उत्पादनाकरीता खुदाई चे काम बंद असते. फक्त स्टॉक असलेला कोळसा बाहेर काढलेल्या जातो.  कन्हान नदीच्या पुराच्या पाण्याने खदानीचा रॅम्प फुटून पाणी शिरल्याने संबंधित प्रशासनाचे मोठे नुकसान झाले.

 ३५० नागरिकांना काढले बोटीने सुरक्षित बाहेर
कामठीः मागील चोवीस तासात कामठी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने मागील वर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली.र  सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंचचे सोळा दरवाजे उघडण्यात आले. परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगली. परिणामी या नदी काठावरील कामठी तालुक्यातील गावांना  पुराचा धोका निर्माण होत कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना व सोनेगावराजा गावाला पुराणे वेढले. दोन्ही गावांना बेटाचे रूप प्राप्त झाले होते. सोनेगावराजा येथे ३५० तर बीडबिना येथे ३६ नागरिक पुरात अडकले होते. तालुका प्रशासनाच्या वतीने त्वरित दखल घेऊन जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने रेस्क्यूंतर्गत बोटीने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्याने नागरिकांचा जीव मुठीत आला. आज कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना, बिनासगम, गोराबाजार, छोटी आजनी, आजनी (रडके) नेरी, सोनेगावराजा, चिकना, भामेवाडा या गावात पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वारेवागाव ग्रामपंचायत अंतर्गत बीडबिना गावाला कन्हान नदीच्या पुराने वेढले होते. गावात ३३ कामगार वास्तव्यास असल्याची माहितीही सरपंच कमलेश बागरे यांना होताच त्यांनी त्वरित तहसीलदार अरविंद हिंगे यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता पुराचे पाणी वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिली. त्यांनी त्वरित जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथक दुपारी दोन वाजता सुमारास पाठवून नागरिकांना  सुरक्षित बाहेर काढले. बिनासंगम येथील कन्हान नदी काठावरील मंदिरात तीन नागरिक पुरात अडकले होते. त्यांनाही रेस्क्यू पथकाने बाहेर काढले. सोनेगावराजा याही गावाला कन्हान नदीच्या पुराने वेढले होते. सरपंच  चंद्रकांत हेवट यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मंदनूरकर यांना पुरजन्य परिस्थितीची माहिती दिली. दुपारी चार वाजता सुमारास रेस्क्यू पथक सोनेगावराजा येथे पोहचून पुरात अडकलेल्या ३५० नागरिकांना बोटीने सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

    
संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com