Trains to Ayodhya: उत्तरप्रदेशात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण 'हाऊसफुल', दक्षिण रेल्वेकडून सोडण्यात येणार 'या' विशेष ट्रेन्स

Trains to Ayodhya: उत्तरप्रदेशात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण 'हाऊसफुल', दक्षिण रेल्वेकडून सोडण्यात येणार 'या' विशेष ट्रेन्स

दक्षिण-मध्य रेल्वेने विविध शहरातून ९ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. यात ७ विशेष गाड्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून तर २ विशेष गाड्या मराठवाड्यातील जालना आणि नांदेड धावणार आहेत.

Ram Mandir Trains Reservation Full: राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल झाले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने विविध शहरातून ९ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. यात ७ विशेष गाड्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून तर २ विशेष गाड्या मराठवाड्यातील जालना आणि नांदेड धावणार आहेत.

गाडी क्रमांक ०७२२२ सिकंदराबाद-अयोध्या धाम-सिकंदराबाद आस्था विशेष गाडी २९ जानेवारीपासून दर एक दिवसाआड २९ फेब्रुवारीपर्यंत नागपूर मार्गे धावणार आहे. जवळपास एक महिनाभर ही विशेष रेल्वे १६ फेऱ्या पूर्ण करेल. आंध्र- तेलंगणातील सिकंदराबाद, काझीपेठ, बल्लारशहा, चंद्रपूर, सेवाग्राम, नागपूर, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर मार्गे धावणार आहे.

नागपुरातून केवळ ४ गाड्या
गाडी क्रमांक ७२२३ काझीपेठ-अयोध्या धाम-काझीपेठ ही विशेष रेल्वे ३० जानेवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाआड आणि परतीची गाडी २ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत १५-१५ अशा ३० फेऱ्या करणार आहे. ७६४९ जालना-अयोध्या धाम- जालना गाडी ४ फेब्रुवारीला जाईल आणि ७ फेब्रुवारीला परतेल. ९ पैकी ४ गाड्यांचा लाभ नागपूरला होत आहे. सिकंदराबाद आणि काझीपेठ येथून या विशेष गाड्या बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम वर्धा आणि नागपूर मार्गे धावतील. (Latest Marathi News)

Trains to Ayodhya: उत्तरप्रदेशात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण 'हाऊसफुल', दक्षिण रेल्वेकडून सोडण्यात येणार 'या' विशेष ट्रेन्स
मराठा आरक्षणाच्या सर्व्हेची प्रमुख जबाबदारी शिक्षकांवरच; आधी सर्व्हे मग शाळा, तहसीलदारांचे निर्देश; अंगणवाडी सेविकांना वगळले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com