Nagpur : विश्वातील सर्वात मोठे ओम असलेले रामधाम

महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते
Nagpur
Nagpur esakal

रामटेक : मनसर येथील रामधाम येथे विशाल आकाराचे ओम साकारलेला आहे. तसेच अमरनाथप्रमाणे बाबा बर्फानी यांची मूर्तीही आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी बर्फानी बाबा अमरनाथचे द्वार भक्तांच्या दर्शनाकरिता उघडल्या गेले. हे द्वार महाशिवरात्रीपासून बंद होणार आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते, अशी माहिती रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

Nagpur
Oily Skin Tips : तेलकट त्वचेसाठी मॉईश्चरायझरची निवड करताय? मग, चेहऱ्यावर लावताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

विश्वातील सर्वात मोठ्या ‘ओम’ची निर्मिती केल्या गेली आहे ज्याचे नाव ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे. तसेच भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादस ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, माता वैष्णोदेवी,भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णच्या जीवन चरित्रावर आधारित झांकीयाँ पहावयास मिळतात.

अशी आहेत बारा ज्योतिर्लिंग

१.सोमनाथ, सोरठ-सौराष्ट्र(गुजरात )

२.मल्लिकार्जुन, श्री शैलम (आंध्र प्रदेश )

३. महाकालेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश )

४. ओंकारेश्वर, शिवपुरी (मध्यप्रदेश )

५. वैद्यनाथ, परळी (महाराष्ट्र)

६. औंढ्या नागनाथ (महाराष्ट्र)

७.केदारेश्वर, केदारनाथ (उत्तराखंड)

८. त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र )

९. रामेश्वर, रामेश्वरम (तामिळनाडू )

१०. भीमाशंकर ( महाराष्ट्र )

११. विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )

१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र)

Nagpur
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

महानागबळेश्वर शिवशक्ती देवस्थान

वेलतूरः उत्तर वाहिनी नागनदीच्या मध्य पात्रात शंकराची स्वयंभू पिंड आहे. हजारो वर्षांपूर्वी येथे श्री ऋख्खड महाराज, श्री गुरूलिंग बाबा, जंगमबाबा यांनी योग आणि तपसाधना केली आहे. कुही शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होते. ४९ वर्षांपूर्वी १९७४ मध्ये हभप मूर्तिकार महाराज (सदाशिवराव) बुरांडे, व त्यांचे परममित्र हभप लटारुजी महाराज बावनकुळे यांनी या जागेचा जीर्णोद्धार करण्याचे व्रत घेतले होते. पंचक्रोशीतील जनतेकडून देणगी जमा करून त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवान अर्धनारी नटेश्वर हे शिवशक्ती स्वरूपात विराजमान आहेत.

येथे महाशिवरात्रीला भव्य जत्रा भरते. मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. भोळा शंकर नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्‍धा आहे. येथील महादेवाला त्रिशूळ अर्पण करण्याची प्रथा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com