Ramtek Lok Sabha Election 2024 :...अन् रामटेकमधून भाजपची संधी हुकली! रामटेकचा गड शिवसेनेकडे; काँग्रेसचं काय होणार?

Loksabha Election 2024 Latest news : रामटेक लोकसभा मतदार संघ गेल्या दोन दशकापासून (२००९ वगळता) शिवसेनेकडे आहे.
Ramtek lok sabha Constituency
Ramtek lok sabha Constituencyesakal

नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघ गेल्या दोन दशकापासून (२००९ वगळता) शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचा हा रामटेक गड तहाच्या माध्यमातून भाजपने आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. तशी व्यूहरचनाही रचली. परंतु अडून बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) त्यांचा मनसुबा हाणून पाडला.

यामुळे रामटेकचा गळाला लावण्याची भाजपची संधी यंदा हुकली. मर्जीतील शिलेदार नेमण्यात मात्र भाजपला यश आले. यंदाही परंपरागत काँग्रेसकडून प्रमुख हल्ला होणार आहे. त्यामुळे रामटेकच्या गडावर झेंडा फडकविण्यात काँग्रेसला यश येते की शिलेदार गड राखतील, हे येत्या काळात स्पष्ट होईल. (Lok Sabha Election 2024 Latest news)

१९९९ पासून हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. सलग दोनचा सुबोध मोहिते विजयी झाले. शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे बंड करीत काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्यासोबत मोहितेही काँग्रेसमध्ये आले. पोट निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

प्रकाश जाधव यांनी शिवसेनेचा गड राखला. त्यानंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेसने गडावर झेंडा फडकविला. मुकुल वासनिक यांनी लढ्यात यश आले. परंतु त्यानंतर शिवसेनेने स्वारी केली आणि गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला.

कृपाल तुमाने या शिलेदारांने ही कामगिरी केली. २०१९ च्या निवडणुकीतही शिवसेनेनेच निवडणुकीचे युद्ध जिंकले. कृपाल तुमानेच्या नेतृत्वातच लढ्याला यश आले. कृपाल तुमानेंच्या विरोधात वातावरण आहे. त्यांना तिकीट दिल्यास गड हातातून जाईल, असा निष्कर्ष भाजपच्या रणनितीकारांनी काढला. शिवसेनेपेक्षा भाजपचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे तह करून गड भाजपला द्यावा, अशी बोलणी भाजपने केली. त्यासाठी आवश्यक फिल्डिंगही लावली. परंतु बंडाच्या वेळेस याच गडावरून रसद मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदे यास तयार झाले नाहीत.

Ramtek lok sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : ‘मविआ’तर्फे जळगावातून करण पवार? भाजपला धक्का देण्यासाठी ‘उबाठा’ गटाकडून जोरदार हालचाली

त्यामुळे हा गड भाजपच्या हाताला लागला नाही. परंतु भाजपला त्यांचाच गडी शिवसेनेच्या गड राखण्यासाठी पाठवण्यात यश आले. त्यामुळे यंदाची संधी हुकली तरी पुढच्या वेळेस मात्र हा गड भाजपकडे येईल, अशी चर्चा आतापासूनच होत आहे.

शिवसेना जिंकली तरी आणि हरली तरी. गड न मिळाल्याने भाजपच्या एका गोटातही नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या फितुरीचा फायदा काँग्रेसला गड काबीज करण्यात होईल, अशीही चर्चा होत आहे. परंतु चर्चा प्रत्यक्षात किती खरी होते, हे निकाला नंतरच स्पष्ट होईल.

Ramtek lok sabha Constituency
Lok Sabha Election : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अमोल कोल्हे, जयंत पाटलांसह ४० दिग्गज नेत्यांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com