कृपाल तुमानेंचा आज शिवसेनेला जय महाराष्ट्र?

‘भाजप’शिवाय तरणे सोपे नसल्याची जाणीव
Ramtek MP Kripal Tumane in Eknath Shinde group
Ramtek MP Kripal Tumane in Eknath Shinde group

नागपूर - रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह सुमारे १२ ते १४ खासदार उद्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. या संदर्भात सोमवारी रात्री सर्व खासदारांची दिल्लीत बैठक होत असून उद्या पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सातत्याने खासदार तुमाने यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. त्यांच्या दिल्ली येथे काही खासदारांची बैठक झाली होती. मात्र या वृत्तास तुमाने यांनी विरोध केला होता. एवढेच नव्हे तर ‘खोडसाळपणाचे वृत्त का देता’ म्हणत पत्रकारांनाही झापले होते.

कळमनुरीचे आमदार संजय बांगर यांनीही सुरूवातीला ‘मी एकनिष्ठच’ म्हणत लगेचच एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तुमाने उशिरा पोहचले होते. मात्र, तोपर्यंत ते अनुपस्थित असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. शुक्रवार आणि शनिवारी शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत दोन दिवस नागपूरमध्ये मुक्कामी होते. दोन्ही दिवस तुमाने त्यांना भेटायला गेले नाहीत. तेव्हापासून तुमाने शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. नागपूरच्या संपर्क प्रमुखांनी बैठकीची माहिती दिली नाही असे तुमाने यांच्या समर्थकांचे म्हणणे होते.

मात्र, आज १२ खासदार शिवसेना सोडणार या वृत्तास तुमाने यांनी नकार दिला नाही. ‘उद्या आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. तोपर्यंत प्रतीक्षा करा’ असे त्यांनी ‘सकाळ''सोबत बोलताना त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना सोडण्याचा निर्णयाप्रत ते आले असल्याचा राजकीय कयास लावला जात आहे.

का सोडणार शिवसेना?

रामटेक लोकसभा मतदारसंघातून तुमाने दोनदा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना-भाजप युतीचा त्यांना चांगलाच फायदा झाला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यास पुढील निवडणुकीत भाजपची साथ मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक जिंकणे अवघड वाटत असल्याने तुमाने शिंदे गटात सहभागी होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com