
Mogarkasa Fungi
sakal
नागपूर : रामटेक तालुक्यातील मोगरकसा-मांगरली संवर्धन राखीव क्षेत्रात तब्बल शंभरहून अधिक बुरशींची नोंद करण्यात अभ्यासकांना यश आले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या या अभ्यासातून विविध प्रकारच्या बुरशींची ओळख पटवून त्यांची सविस्तर यादी तयार करण्यात आली आहे. जंगलातील जैवविविधतेच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.