लई भारी! - नागपुरात आढळला दुर्मीळ साप 

Rare Indian Egg Eater Found In Nagpur
Rare Indian Egg Eater Found In Nagpur

नागपूर, :  शहरापासून १२ किलो मीटर अंतरावर असलेल्या वेळा हरिश्चंद्र या गावात आज दुर्मीळ अंडी भक्षक साप आढळला. सर्पमित्र विशाल डंभारे यांनी या सापाला ताब्यात घेऊन सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला आणले. 

या सापाविषयी माहिती मिळाल्यावर डंभारे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. सापाला सुरक्षितरीत्या पकडल्यानंतर तो अंडी भक्षक साप (Indian egg eater) असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ट्रान्झिट सेंटरचे पशुवैद्यकीय अधिकारी सय्यद बिलाल यांनी सापाची वैद्यकीय तपासणी केली. सापाला अधिवासात सोडायला काही हरकत नाही असे प्रमाणपत्र दिले आहे. ट्रान्झिटचे वनपाल अनिरुद्ध खडसे आणि डॉ सय्यद बिलाल यांच्या नेतृत्वात त्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.

विदर्भ हा भारतीय अंडीभक्षक सापाचा महत्त्वाचा अधिवास आहे. विदर्भातल शेकडो एकर झुडपी जंगल संपुष्टात येत असल्याने पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत आहेत. परिणामी या पक्षांच्या अंड्यांवर गुजराण करणारा अंडीभक्षक साप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हं दिसत आहेत. 

पंधरा वर्षांपूर्वी आढळला होता साप 

हा साप वर्धेचे सर्पमित्र पराग दांडगे यांना २००५ मध्ये आढळला होता. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात पराग दांडगे आणि डॉ. आशिष टिपले यांनी अंडीभक्षक सापाबद्दलची नव्यानं काही तथ्ये मांडली आहेत. महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांमध्ये हा साप आढळत. त्यातले ८ जिल्हे हे विदर्भात आहेत. शिवाय, तेलंगण राज्यातल्या बेलम्पल्ली इथं सुद्धा या सापाचं अस्तित्व आहे. अभ्यासलेल्या ६६ अंडीभक्षक सापांपैकी ४० साप रस्त्यांवर वाहनाखाली चिरडून ठार झाल्याचं नोंदविण्यात आलेले आहे. त्यामुळे या सापांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचंही स्पष्ट झाले आहे. 

सापाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष 

भारतीय अंडीभक्षक साप हा पक्ष्यांची अंडी सोडून इतर कुठलेही भक्ष्य खात नाही. हा साप वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार अनुसूची एक म्हणजेच वाघ असलेल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. परंतु या सापाकडे सपशेल दुर्लक्ष केल्या जात असल्याची खंतही सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com