नागपूर विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित योगदान द्यावे - राज्यपाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University 100 year Anniversary Program

नागपूर विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित योगदान द्यावे - राज्यपाल

नागपूर : विद्यापीठाचा इतिहास गौरवशाली आहे. त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्यातील विकासासाठी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी एकत्रीतपणे येऊन योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संशोधक डॉ अनिल काकोडकर उपस्थित होते. कोशयारी म्हणाले, विद्यापीठाने देशाला अनेक नामवंत आणि कर्तृत्ववान विद्यार्थी दिले आहे. १०० वर्षाचा इतिहासातून आपण प्रेरणा घेऊन समोर जायला पाहिजे. माजी विद्यार्थी म्हणून मी या विद्यापीठाचा विकासात काय योगदान देऊ शकतो याचा विचार करावा.

आज देश विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. देशाला सक्षम नेतूत्व मिळाले आहे. त्यातून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यास सुरुवात झाली आहे. या धोरणातून मूल्यशिक्षण देण्यात येईल. ज्यातून एक सुदृढ समाज निर्माण होईल. आपले विद्यापीठ केन्द्रस्थानी असल्याने या केंद्राला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University 100 Year Anniversary Program Bhagat Singh Koshayari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..