esakal | नागपूर : अधिष्ठाता पदाची नियुक्ती दुसऱ्यांदा चुकली
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : अधिष्ठाता पदाची नियुक्ती दुसऱ्यांदा चुकली

नागपूर : अधिष्ठाता पदाची नियुक्ती दुसऱ्यांदा चुकली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरशाखीय अधिष्ठाता पद आणि ग्रंथपाल पदासाठी उद्या शनिवारी (ता.१८) मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. मात्र, मुलाखतीला आलेल्या तिघांपैकी एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा समितीने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरशाखीय शाखा अधिष्ठाताविना राहणार आहे. याशिवाय ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. विजय खंडाळ यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठात गेल्या महिन्यात अधिष्ठाता पदासाठी मुलाखती घेण्यात आल्यात. यामध्ये मर्जीतील लोकांनाचीच निवड करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, एकच व्यक्ती मुलाखतीसाठी असताना, त्याची अधिष्ठाता म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय एक महिन्यापूर्वी प्रोफेसर झालेल्या प्राध्यापकाच्या गळ्यात अधिष्ठाता पदाची माळ पडली. मात्र, यादरम्यान आंतरशाखीय शाखेसाठी घेण्यात येणारी मुलाखत अचानक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये राज्यपाल नामित सदस्यांनेच अर्ज केल्याचे समोर आल्याचे दिसून आले. त्यानुसार या शाखेचा अधिष्ठाता नेमण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा मुलाखती घेण्याचे ठरविले. त्यातून शनिवारी उमेदवारांना मुलाखती घेण्यात आल्यात.

हेही वाचा: गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

मात्र, प्राचार्य डॉ. सुहास पाटील यात अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. दाणी. डॉ. ढोरे यांच्यासह इतर उमेदवारांनी मुलाखत दिली. मात्र, विद्यापीठाने त्यांना अपात्र घोषित केले. या शाखेवर माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने त्यांच्या मतातील व्यक्तीशिवाय कुणाचीही निवड होणार नाही, याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनच एकदा मुलाखती रद्द झाल्याचे बोलण्यात येत आहे. यावेळी त्यांचा उमेदवार हजर नसल्यामुळे असे करण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

हेही वाचा: लसीकरण पूर्ण झालेल्या इमारतींवर लागणार लोगो, मुंबई महापालिकेचा निर्णय

ज्ञानस्त्रोत संचालकपदी डॉ. विजय खंडाळ

ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकासाठीही शनिवारी मुलाखती घेण्यात आल्यात. यामध्ये १६ उमेदवारांचा समावेश होता. त्यामधून डॉ. विजय खंडाळ यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. विजय खंडाळ १९९७ साली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर बी.लिब आणि एम.लिबसह आचार्य पदवी मिळविली. त्यांना ग्रंथपाल म्हणून प्रदिर्घ अनुभव आहे. संगणिकीकरण तज्ज्ञ म्हणून त्यांनी यशंवतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय अत्याधुनिक केले आहेत.

loading image
go to top