Ravindra Katolkar: बोगस शालार्थ आयडी घोटाळा गडद; माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यावर कारवाईची शक्यता
Shalarth ID scam: नागपूरमधील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याकडे काही काळ प्राथमिक विभागाचा प्रभार असल्याने त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात पोलिसांनी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केल्यावर आता माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर हे सुद्धा पोलिसांच्या रडारवर आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडेही काही काळ प्राथमिक विभागाचा प्रभार होता.