esakal | "महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका"; नागपुरातील मराठा समाज संयोजकाचं परखड मत

बोलून बातमी शोधा

null

'महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका; नागपुरातील मराठा समाज संयोजकांचं परखड मत

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेला मराठा आरक्षणाचा आराखडा (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्‍वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या.एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. मात्र आता या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून तीव्र प्रतिकिया (Reactions on Maratha Reservation) उमटायला सुरुवात झाली आहे. नागपुरातील (Nagpur) सकल मराठा समाजाचे शहर संयोजक नरेंद्र मोहिते (Narendra Mohite) यांनीही आपलं मत व्यक्त केलंय. (Reaction of Nagpur Maratha community leader on Decision of SC on Maratha Reservation)

हेही वाचा: डागा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ; कामबंद केल्याचा फटका

सर्वोच्च न्यायालयानं आज मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य कसा करावा संपूर्ण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोहिते यांनी दिली आहे.

एका समाजाला एक न्याय तर दुसऱ्या समजला वेगळा न्याय कसा? महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आलंय मग महाराष्ट्रासाठी कायदे वेगळे आहेत का? बोटावर मोजण्याइतक्या काहींची परिस्थिती वगळता इतर संपूर्ण मराठा समाजाची आर्थिक स्थिती चांगली नाही. जर इतर समाजातील लोकं मागास असू शकतात तर मराठा समाज मागास असू शकत नाही का? असे प्रश्न नरेंद्र मोहिते यांनी उपस्थित केले आहेत.

यापेक्षा मोठी शोकांतिका नाही

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं असेल तरी राज्य सरकारनं मनात आणलं तर राज्यात संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. मात्र सरकारला मराठ्यांना सतवायचं आहे की काय असाच प्रश्न निर्माण होतो. ज्या महाराष्ट्राचं मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं अशा समाजाला आरक्षण मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही असंही नरेंद्र मोहिते म्हणाले.

तर हा मराठा समाजावर अन्याय ठरेल

फडणवीस सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा आराखडा अधिक सक्षम होता आणि त्यात ठाकरे सरकारकडून बदल करण्यात आलेत त्यामुळे आरक्षण रद्द झालं असे आरोप होत आहेत. हा केवळ राजकारणाचा एक भाग असू शकतो. मात्र यात सत्यता असेल तर हा मराठा समाजावर मोठा अन्याय ठरेल असंही मोहिते म्हणालेत.

हेही वाचा: ‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

लोकांचा जीव महत्वाचा

संविधानापुढे आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणीही मोठं नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू नये. कोरोना महामारीमध्ये आंदोलनापेक्षा लोकांचा जीव वाचणं अधिक महत्वाचं आहे. मात्र आरक्षणाची मागणी आम्ही मागे घेणार नाही. वेळ आली की योग्य तो निर्णय नक्कीच घेऊ आणि आमची पुढील दिशा ठरवू असंही नरेंद्र मोहिते यांनी म्हंटलंय.

हा निर्णय म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखं आहे. मात्र मराठा समाज लढवैय्या आहे आम्ही हार मानणार नाही. मात्र कोरोनाकाळात लोकांचा जीव अधिक महत्वाचा आहे. मराठा बांधवांनी कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू नये.
- नरेंद्र मोहिते, सकल मराठा समाज, नागपूर संयोजक
मराठा समाजाचं नोकरीतील आणि शिक्षणातील आरक्षण रद्द होणं हा प्रचंड मोठा धक्का आहे. मराठा समाजातील अनेक विदयार्थी हे मागासलेले आहेत संपूर्ण शुल्क भरण्यास असमर्थ आहेत आता त्यांच्यावर शिक्षण सोडण्याची वेळ येणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
- कार्तिक जाधव, युवक, मराठा समाज

(Reaction of Nagpur Maratha community leader on Decision of SC on Maratha Reservation)