नेमके काय म्हणाले तुकाराम मुंढेंनी फेसबुक लाईव्हमध्ये, वाचाच

Read exactly what Tukaram Mundane did on Facebook Live
Read exactly what Tukaram Mundane did on Facebook Live
Updated on

नागपूर : शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत 21 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील खोकला, ताप असलेल्या 3200 जणांवर उपचार करण्यात आले. काहींची चाचणीही करण्यात आली असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सांगितले. मात्र नागपूरकर सोशल डिस्टेन्स पाळत नसल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी आणखी काही भाजी बाजार बंद करण्याचा इशारा दिला.

आयुक्त मुंढे यांनी आज फ़ेसबुक लाईव्हमधून नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार व व्यक्तीवर कसा हल्ला होतो, त्यापासून सावध राहण्याच्या उपाययोजनेची माहिती दिली. घरातच राहण्याचे आवाहन करीत त्यांनी महापालिकेच्या विविध उपक्रमातून नागरिकांची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

एचआयव्हीबाधित, क्षयरोग रुग्ण 'हायरिस्क' रुग्ण असून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. खाजगी रुग्णालयात निमोनिया रुग्णांचे स्व्याब घेतले जात आहे. या खाजगी रुग्णालयांना मनपाचे पथक भेट देत असून असे 79 रुग्ण निदर्शनास आले. त्यांची स्व्याब तपासणी करण्यात आली. यापैकी 72 रुग्ण निगेटिव्ह असून इतरांचा अहवाल यायचा आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. सुरुवातीला विमानाने शहरात आलेल्या 950 जणांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दिल्लीहून आलेल्या दोन रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांचीही माहीती घेण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांच्या घरापासून तीन किमी परिसरातील घरांची दररोज 14 दिवस तपासणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर हा परिसर सील करण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. लोकांना भाजीपाला, किराणा, औषधी घरपोच मिळावी यासाठी महापालिकेने नियोजन केले. या सर्व दुकानदारांचे फ़ोन नंबर उपलब्ध करून दिले. परंतु नागरिक मोकळ्या जागेत सुरू केलेल्या भाजी बाजारात गर्दी करून सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चार बाजार बंद केले. आणखी बाजार बंद करावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

25 हजार नागरिकांना जेवण

शहरात 269 निवारा केंद्र सध्या आहेत. यात बेघर, गरीब, परराज्यातील मजूर यांना तसेच परराज्यातील विद्यार्थी, भाडेकरू व घरी असलेले दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अशा एकूण 25 हजार नागरिकांना दररोज जेवण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवारा केंद्रातील 1200 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध सामाजिक संस्थानी मोठी मदत केली, असेही आयुक्त म्हणाले. काही नागरिकांना धान्य, किराणा असलेली किट देण्यात येत आहे.

आयुक्त उवाच

  • - सलूनची दुकाने बंद राहतील.
  • -आपली बस वाहक, चालकांचे वेतन दोन टप्प्यात.
  • - गर्भवती महिलांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 108 क्रमांकावर किंवा महापलिकेच्या नियंत्रण कक्षात फोन करा.
  • - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच साजरा करा.
  • - सोशल मीडियामार्फत अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई करणार.
  • - कोरोनाबाबत काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी, शिक्षक, वाहनचालक सर्वांचा 50 लाखांचा विमा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com