अमरावतीत फिकट पायाचा पर्ण वटवट्या पक्ष्याची नोंद

मनोज बिंड, वैभव दलाल, अभिमन्यू आराध्य, प्रशांत निकम पाटील यांनी टिपले छायाचित्र
bird
birdSakal

अमरावती - उन्हाळी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण व छायाचित्रण करताना एप्रिल महिन्यात मनोज बिंड, वैभव दलाल, अभिमन्यू आराध्य आणि प्रशांत निकम पाटील यांनी फिकट पायाचा पर्ण वटवट्या या पक्ष्याचे छायाचित्र टिपून संपूर्ण देशस्तरावर महत्त्वपूर्ण नोंद केली. या पक्ष्याचे इंग्रजी नाव पेल लेग लिफ वॅरब्लर, असे आहे. अंदमान निकोबार बेटांवरील तुरळक नोंदी वगळता भारताच्या मुख्य भूमीवरील ही पहिलीच महत्त्वपूर्ण नोंद ठरली आहे.

फिलोस्कोपस टेनेलिपस, असे शास्त्रीय नाव असलेल्या या पक्ष्याची ओळख पटवण्यासाठी जगविख्यात पुस्तक ‘बर्ड्‍स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंटल’चे लेखक टीम इन्स्कीप, मुंबई येथील पक्षी अभ्यासक आशिष बाबरे आणि पक्षितज्ज्ञांच्या फेसबुक ग्रुपची मोलाची मदत झाली. साधारणपणे १० ते ११ सेंमी लांबीचा हा चिमुकला पक्षी इतर पर्ण वटवट्याप्रमाणेच फारसा आकर्षक दिसत नसला तरी फिकट गुलाबी रंगाचे पाय आणि खालच्या चोचेच्या मुळाशी असलेला फिकट गुलाबी रंग हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सोबतच हिरवट राखाडी पंख, लांब भुवई, पंखांवर फिकट अस्पष्ट दोन पांढऱ्या रेषा व गळ्याखालील पांढरा भाग ही ओळख आणि खुणा आहेत. झाडांच्या पानाआड दडलेले अगदी छोटे कीटक, कृमी हे याचे खाद्य आहे. ते टिपण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात झाडांच्या वरच्या भागातच याचे जास्त विचरण होते. परंतु नंतर ऊन तापू लागताच झुडपांच्या सावलीत तुलनेने कमी उंचीवर या पक्ष्याच्या हालचाली आढळून आल्या आहेत. फिलॉसकॉपीडी कुळातील या अस्थिर व चपळ पक्ष्याचे दर्शन भारतात दुर्मीळ असल्याने याबाबत स्थानिक फारशी माहिती उपलब्ध नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com