Itwari Junction Redevelopment : १२ कोटी खर्चून इतवारी स्थानकाचा पुनर्विकास; दिव्यांग, वृद्धांसाठी विशेष सुविधा

Amrit Bharat Station Scheme : रेल्वे मंत्रालयाने भारतात लहान स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली.
Redevelopment of Itwari railway station cost of 12 crores Special facilities for disabled elderly
Redevelopment of Itwari railway station cost of 12 crores Special facilities for disabled elderlySakal

Nagpur News : हावडा-नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. सहा प्लॅटफॉर्म असणाऱ्या स्थानकावरून १० गाड्यांची सुरुवात होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या स्थानकाचा कायापालट होणार आहे. तब्बल १२ कोटी ३९ लाख रुपये खर्च करून स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने भारतात लहान स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली. या अंतर्गत दक्षिण-पूर्व-मध्यच्या या स्थानकाची निवड झाली आहे. येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, त्या तुलनेत स्थानक लहान आहे.

तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधाही अपुऱ्या आहेत. या स्थानकाच्या आधुनिकीकरणात फलाटाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील मुख्य इमारत ही कला व संस्कृती दर्शविणारे आकर्षक डिझाईन असणार आहे.

Redevelopment of Itwari railway station cost of 12 crores Special facilities for disabled elderly
Nagpur Crime : पोलिसांना डांबून छत्तीसगडमधून पळालेल्या तिघींना अटक

सर्क्युलेटिंग एरिया, उद्यान, भव्य पार्किंग, हायमास्ट लाईट, कॉनकोर्सचा विकास, चित्रकारी व स्थानिक कलाकृती, आकर्षक पोर्च, भुवनेश्वर मॉडलच्या धर्तीवर शौचालय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशस्त प्रतीक्षालय, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा राहणार आहेत.

ही कामे होणार

 • परिसराचे पूर्ण सौंदर्यीकरण

 • आकर्षक मुख्य प्रवेशद्वार

 • प्रवाशांच्या क्षमतेनुसार प्रशस्त प्रतीक्षालय

 • चांगल्या सुविधांचे रिटायरिंग रूम

 • दिव्यांगासाठी शौचालयाची व्यवस्था

 • उच्चस्तरीय व लांब प्लॅटफॉर्मची निर्मिती

 • उच्च गुणवत्तेचे साईन बोर्ड, एस्केलेटर

 • स्थानकाच्या मार्गाचे रुंदीकरण

 • रस्त्यावर पायी चालणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था

 • पार्किंगची आधुनिक व प्रशस्त व्यवस्था

 • आकर्षक विद्युत रोषणाई व शुद्ध पाण्याची व्यवस्था

 • संपूर्ण सुविधा युक्त विश्रांती कक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com