esakal | ...तर धार्मिक स्थळात प्रवेश नाही; अशी आहे नियमावली | Religious Places
sakal

बोलून बातमी शोधा

temple

...तर धार्मिक स्थळात प्रवेश नाही; अशी आहे नियमावली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना नियंत्रणात येत असल्याने सात ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली करण्यात येणार आहे. परंतु, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशासाठी धार्मिक गुरूंप्रमाणेच भक्तांनाही लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. त्यामुळे लस घेतल्याचे प्रमाणपत्र नाही तर मंदिरात प्रवेश नाही.

कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाने ८ वी ते १२ वी वर्गापर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ५ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा: विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी धार्मिक संघटनांसोबत भाजपकडूनही आंदोलन करण्यात आले. धार्मिक स्थळे सुरू होत नसल्याने शासनावर टीकाही झाली. परंतु, नागरिकांचे हित लक्षात घेता शासनाने परिस्थिती पाहूण निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. धार्मिक स्थळात प्रवेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली निश्चित करण्यात आली.

धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी तसेच प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे. प्रवेश करते वेळी संबंधित व्यक्तीस हे प्रमाणपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे. १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिला.

loading image
go to top