

Nagpur News
esakal
नागपूर : शहरात काही मोजकी मैदाने शिल्लक आहेत, त्यावरही सराव करताना खेळाडूंना अनेक अडचणी येताहेत. अशीच काहीशी अवस्था सध्या रेशीमबाग मैदानाची झाली आहे. या मैदानावर रोज अनेक धावपटू सराव करतात. मात्र प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी अचानक मैदानाच्या सर्व गेटला कुलूप ठोकल्याने अनेक धावपटूंना सरावापासून वंचित राहावे लागले.