Rohit Pawar : राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचे संकेत, जयंत पाटील यांनी मुक्त करण्याची केली विनंती
Nagpur News : अनुभवी आणि रस्त्यावर उतरणाऱ्या युवा नेत्याच्या हाती नेतृत्व सोपवायला हवे. असा नेता आम्ही शोधला आहे. मी आत्ताच कोणाचे नाव सांगणार नाही. कोणाचे नाव घेतले तर शेपूट वाढत जाते. नंतर निर्णय घेताना बऱ्याच अडचणी येतात.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्य कोणाला करायचे हे जवळपास ठरवले आहे. नवा प्रदेशाध्यक्ष युवा, धडपड्या आणि अनुभवी राहणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी आज नागपूरमध्ये दिले.