esakal | मनपा शाळेच्या छताचे स्लॅब कोसळले, ऑनलाइन शाळेमुळे अनर्थ टळला
sakal

बोलून बातमी शोधा

slab

मनपा शाळेच्या छताचे स्लॅब कोसळले, ऑनलाइन शाळेमुळे अनर्थ टळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या (nagpur municipal corporation) सुरेंद्रगढ हिंदी प्राथमिक शाळेची (surendragadh hindi primary school nagpur) दुरवस्था झाली असून आज दुपारी छताच्या स्लॅबचा भाग कोसळला. ऑनलाईन शाळा (online school) सुरू असल्यामुळे कुणीही विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वी शाळेच्या प्रसाधनगृहाच्या छताचाही भाग कोसळला असून महापालिकेने दुरुस्तीऐवजी केवळ रंगरंगोटी केल्याचा आरोप केला जात आहे. (roof of nagpur municipal corporation school collapsed)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम नागपुरातील सुरेंद्रगढ परिसरात मनपाची हिंदी प्राथमिक शाळा असून इमारत पूर्ण जीर्ण झाली आहे. या शाळेची दुरुस्ती करण्यात आली. परंतु निकृष्ट दर्जाचे प्लास्टर, साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप जनहितचे संयोजक अभिजीत झा यांनी केला. शुक्रवारी दुपारी या शाळेच्या छताचे प्लास्टर खाली पडले. सुदैवाने ऑनलाईन शाळा सुरू असल्याने विद्यार्थी नव्हते. अन्यथा हे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून ते जखमी झाले असते, असे झा यांनी सांगितले. शाळेची संपूर्ण इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. इमारत बांधकामात निष्कृष्ट साहित्य वापरल्याचे उघड आहे. या इमारतीत वापलेले लोखंड अत्यंत कमकुवत स्वरुपाचे आहे. सिमेंटच्या अत्यल्प वापरामुळे शाळेच्या बाहेरच्या बाजूचे प्लास्टर गळून पडले असून विटा दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी झाडांची मुळे भितींत शिरल्यामुळे इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये इलेक्ट्रीक फिटिंग नाही. महानगरपालिकेने दुरुस्तीच्या नावावर केवळ रंगरंगोटी केली, प्रत्यक्षात कुठलेही ठोस काम केले नाही, असा आरोप झा यांनी केला. या शाळेच्या नवनिर्मितीसाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. एखादा अपघात घडल्यावर कामाला सुरुवात करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या ७५ शाळा डिजीटल करण्याची घोषणा केली. याचा शुभारंभ त्यांनी सुरेंद्रगढ शाळेतून करावा असे झा म्हणाले. महानगरपालिकेने या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता ऑनलाईन शाळा सुरू आहे. तरीही सावधगिरी बाळगत ही शाळा दुसरीकडे स्थानांतरित करण्यात येणार आहे. याबाबत उद्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
- प्रिती मिश्रीकोटकर, शिक्षणाधिकारी, मनपा.
loading image