दाभाडकरांना रुग्णालयातून घरी नेण्याचा निर्णय नातेवाईकांचा, RTI मधून माहिती उघड

narayan dabhadkar
narayan dabhadkare sakal
Updated on

नागपूर : शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे (RSS) जेष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर (narayan dabhadkar death case) यांनी कोरोनाबाधित तरुणासाठी रुग्णालयातील बेड सोडला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर यावर टीका करण्यात आली होती. मात्र, याबाबत आता माहिती अधिकारातून (RTI) एक अहवाल समोर आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जावई व इतर नातेवाईकांनीच त्यांना स्वतःहून रुग्णालयातून नेले होते, अशी माहिती समोर आली आहे. (RTI information about narayan dabhadkara death and rss comes out)

narayan dabhadkar
अल्पवयीन मुलीने घर सोडले, तिकीट विचारताच समोर आला प्रकार

माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी या तपशीलाची माहिती अधिकारातून मागविली होती. त्यानंतर तो अहवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजप आणि संघावर टीका केली. दाभाडकरांच्या मृत्यूचा वापर संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला.

नारायणराव दाभाडकर हे २२ एप्रिलला नागपूर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी परतले होते. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यासंबंधित सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता. 'मी आता ८४ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगले असून मला आता उपचाराची गरज नाही. गरजू रुग्णाला बेड द्या आणि त्याच्यावर उपचार करा, असे दाभाडकर यांनी म्हटल्याचे या पोस्टमध्ये होते.' भाजपच्या अनेक नेत्यांनी या त्यागाचे कौतुक केले होते. मात्र, यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी टीका देखील केली होती. मात्र, आम्हाला बाबांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नसल्याची प्रतिक्रिया त्यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी दिली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कायद्यांना स्थान देत नाही. त्यामुळे दाभाडकर प्रकरणात देखील काहीतरी घोळ असेल असे वाटले. कारण, कोरोनाच्या काळात एक माणूस आपला बेड दुसऱ्याला देईल, असे शक्यच नव्हते. आरएसएस हे त्यांच्या मृत्यूचा गैरवापर करत होते. त्यामुळे मी आरटीआयअंतर्गत माहिती मागविली.
- मोहनिश जबलपुरे, आरटीआय कार्यकर्ते, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Engineering Student Killed
Nagpur News
Nagpur News
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com