नागपूर विद्यापीठाने घेतले दोन दिवसात तब्बल ३२९ विषयांचे पेपर; परीक्षा संपवण्याची घाई 

RTMNU is in hurry to end final year exams
RTMNU is in hurry to end final year exams

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा संपविण्याची घाई झालेली असून विद्यापीठाने गुरूवारी आणि शुक्रवारी एकूण ३२९ विषयांच्या फेरपरीक्षांचे आयोजन केले आहे. यात एमए, एमएसडब्ल्यू, एमएससी आणि एम.कॉम यासारख्या विविध विषयांच्या समावेश आहे.

विद्यापीठाद्वारे ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनुपस्थित व पेपर देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा यात समावेश करण्यात आला आहे. गुरूवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता.१३) घेण्याचे ठरले. मात्र, नागपूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षेचे वेळापत्रकात विषयांचे पेपरमध्ये कुठलीही गॅप न दिल्याने विद्यार्थी एका पाठोपाठ एक पेपर सोडविणार असे चित्र निर्माण झाले. 

यात प्रामुख्याने बी.एसस्सी सारख्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन दिवसांत दोन विषय कसे घ्यावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला. तीच परिस्थिती आता पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांती आहे. नागपूर विद्यापीठाने गुरूवारी (ता. १२) एमए चौथ्या सेमेस्टरसाठी सीबीएस आणि सीबीसीएस पॅटर्नचे एकूण २२ विषयांची परीक्षा घेतली. एम.कॉम चतुर्थ सेमेस्टरच्या ११ विषयांची परीक्षा गुरुवारी घेण्यात आली. 

आता शुक्रवारी एम.एसस्सीच्या चौथ्या सेमेस्टरचे ७९ विषय आणि एमएसडब्ल्यूचे १० विषय एकत्र घेण्याच येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजतापासून हा पेपर सुरू होईल. प्रत्येक पेपरला एक तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. पदव्युत्तरच्या चारही अभ्यासक्रमाचे पेपर एका पाठोपाठ ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास होत आहे. 

नागपूर विद्यापीठाला ३१ नोव्हेंबरपूर्वी निकालाची घोषणा करायची आहे. मात्र, परीक्षा संपल्याशिवाय विद्यापीठ निकाल जाहीर करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने घाईघाईने परीक्षा घेतल्याचे दिसून येत आहे, असे विद्यार्थी व शिक्षकांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com