
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे अमरावती मार्गावरील परिसरात पाच मजली नवीन परीक्षा इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने नुकताच या इमारतीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला. ही इमारत फार्मसी विभागाच्या आवारातील मोकळ्या जागेत बांधली जाणार आहे.