Nana Patole : नियम ९३ बदलणे म्हणजे ‘दाल मे काला’; नाना पटोले यांची केंद्र व निवडणूक आयोगावर टीका
Election CommissionIndia : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत नियम ९३ मध्ये घाईने केलेल्या बदलांवर प्रश्न उपस्थित केले.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मॅच फिक्सिंग नव्हती तर आयोगाने नियम-९३ का बदलला, या बदलासाठी केंद्राने ४८ तासांच्या आत अधिसूचना का काढली, असा सवाल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.