Samruddhi Highway : समृद्धीवर ट्रॅव्हल्सने प्रवास... नको रे बाबा ! नागपुरातून धावणाऱ्या ७० टक्के गाड्यांची संख्या रोडावली

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रश्न पडला आहे.
Samruddhi Highway
Samruddhi Highwaysakal
Updated on

अखिलेश गणवीर

Nagpur : प्रवास करताना सुरक्षा महत्त्वाची. जीव धोक्यात घालून प्रवास कशाला करायचा असा प्रश्न आता समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम सेवेवर झाला असून ७० टक्के ट्रॅव्हल्सची संख्या समृद्धीवर रोडावल्याचे वास्तव आहे.

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर नागपूर-पुणे असा प्रवास समृद्धी महामार्गावर करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर ट्रॅव्हल्स संचालकसुद्धा फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघातापूर्वी नागपुरातून रोज पुण्याकरिता ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता ही संख्या २० वर आली आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. आधी दरदिवशी नागपूर वरून ५० ते ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता हीच संख्या १५ ते २० वर आली आहे.

-राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

Samruddhi Highway
Samruddhi Highway Accident : समृद्धीच्या कामावेळी वापरलेल्या रस्त्यांची दुरवस्था; दुरूस्तीच्या आश्वासनाला बगल

आपला जुनाच मार्ग बरा

समृद्धीवर नेहमी अपघाताच्या घटना होत असताना आधीच लोकांमध्ये भीती आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या घटनेने त्यात आणखी भर पडली. त्यामुळे प्रवासी समृद्धी ऐवजी पूर्वीच्या नागपूर-छत्रपती संभाजीनगर-पुणे या जुन्याच मार्गाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे. समृद्धीवर सुपरफास्ट जाण्यापेक्षा थोडा वेळ लागला तरी चालेल, मात्र प्रवास सुरक्षित असायला हवा, असे प्रवाशांना वाटू लागले आहे. आता ट्रॅव्हल्स कंपन्या देखील या मार्गावर धावायला फारशा उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

शिक्षणासाठी माझे नेहमीच पुण्याला जाणे असते. माझी पहिली पसंती रेल्वेलाच आहे. रेल्वेमध्ये तिकीट आरक्षण मिळाले नाही तर मी ट्रॅव्हल्सने जातो. समृद्धी मार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातामुळे मनात भीती निर्माण झाली आहे.

-अनमोल नगरारे, प्रवासी

Samruddhi Highway
Nagpur : महंगाई मार गई ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेतच गेली नऊ वर्षे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.