Sanjay Raut : खासदार संजय राऊत गुरुवारी नागपुरात; कार्यक्रमांबद्दल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Latest Marathi news

शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी नागपुरात; दौऱ्याबाबत उत्सुकता

नागपूर : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गुरुवारी (ता. १४) नागपुरात येणार आहे. मात्र, जिल्हा प्रमुखांपासून कोणालाच त्यांच्या शहरातील कार्यक्रमांची माहिती नाही. राऊतांच्या दौऱ्याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. शहर शिवसेनेतील वातावरण बघता मोठा असंतोष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Sanjay Raut Latest Marathi news)

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रथमच नागपुरात येणार आहे. विशेष म्हणजे, राऊत यांनी आपण वारंवार नागपूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी सेना एकजूट होती. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीने पुढील निवडणुका एकत्रितपणे लढाव्या यावर सर्व नेत्यांचे एकमत होते.

हेही वाचा: केसरकरांना राष्ट्रवादीचे उत्तर; करून दिली भाजपकडून झालेल्या अपमानाची आठवण

संजय राऊत यांनी भाजपला झुकते माप दिल्याने विदर्भात शिवसेनेचे (Shiv Sena) नुकसान झाल्याचे सांगितले होते. यापुढे ही चूक होणार नाही, असाही दावा केला होता. मात्र, राज्यात अचानक राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेमध्येच मोठी फूट पडली आहे. आता उरलेल्या नेत्यांना शिवसेनेच्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेत मोठा असंतोष

नागपूरमध्ये संपर्क प्रमुखांवरून शिवसेनेत मोठा असंतोष खदखदत आहे. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडून दक्षिण नागपूरची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यांच्याऐवजी दुसरे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडे हा मतदारसंघ सोपविला आहे. दोनच दिवसांपूर्वी संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी शहरप्रमुख प्रवीण बरडे यांच्याकडून पूर्व नागपूर काढून घेतले. त्याऐवजी शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्याकडे पूर्व नागपूर सोपविले आहे. त्यामुळे असंतोषात आणखीच भर पडली आहे.

वाद उफाळून येण्याची शक्यता

प्रवीण बरडे यांनी पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे याची तक्रार केली आहे. या सर्व घडामोडी आणि असंतोषावर संजय राऊत काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी बैठक बोलावल्यास मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Web Title: Sanjay Raut Shiv Sena Nagpur Curiosity Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..