esakal | nagpur news, nagpur latest news, nagpur marathi news, nagpur university news

बोलून बातमी शोधा

file photo
बापरे! प्रश्नपत्रिकेसोबतही मिळतात उत्तरेही, पदव्युत्तर परीक्षा ठरताहेत नावापुरत्या
sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर तृतीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात येत आहे. मात्र, या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाठविण्यात येत असलेल्या विविध विषयांच्या पेपरसह त्याची उत्तरेही महाविद्यालयांद्वारे पाठविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकाराने महाविद्यालयस्तरावरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमुळे वाढले कौटुंबिक कलह! आठ महिन्यांतच वर्षभराची प्रकरणे

विद्यापीठाद्वारे २५ मार्चपासून परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यामध्ये पदव्युत्तर स्तरावरील सर्व परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे ठरले. त्यानुसार महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमातील तृतीय सत्राच्या परीक्षा घेणे सुरू आहे. हे करीत असताना महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका तयार करुन विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म, क्लासमेटच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घ्यावयाची आहे.विशेष म्हणजे यासाठी विद्यापीठाकडून परीक्षेची एक विशिष्ट पद्धती ठरवून देण्यात आली आहे. मात्र, याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिकेसोबत त्याची उत्तरेही विद्यार्थ्यांना पाठविणे सुरू केले आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महाविद्यालयांवर परीक्षेची जबाबदारी देण्यात आली खरी मात्र, परीक्षेची कुठलीही नियमावली, पारदर्शकता न पाळता सर्रार उत्तर पाठवण्याचा गैरप्रकार घडत असल्याने परीक्षेचा खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत असा गैरप्रकार होत असल्याने ऑनलाइन परीक्षा यंदाही नाममात्र ठरणार आहे.

हेही वाचा - किन्नर उत्तमबाबावर कारागृहात सामूहिक अत्याचार; आईला फोनवर सांगितली माहिती

व्हॉट्सअपवर उत्तरे, नाममात्र परीक्षा -

ऑनलाईन परीक्षांमध्ये महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिकेसह उत्तरेही पाठवली जात असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन परीक्षा म्हणजे उत्तीर्ण होण्याची हमखास खात्री असल्याने विद्यार्थ्यांकडून ऑनलाइनची मागणी केली जाते. ऑनलाइनमध्ये केवळ ४० गुणांची परीक्षा असली तरी पारदर्शी होणे अपेक्षित आहे. मात्र, महाविद्यालयांकडूनच आता नियमावली तुडवली जात असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचा मोठा फायदा होत आहे. परिणामी यंदाही निकालामध्ये सर्वांना पैकीच्या पैकी गुण मिळणे अपेक्षित झाले आहे.