
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांचा काही दोष नाही, उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. या संदर्भात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजनभवन येथे माध्यमांशी बोलताना दिली.