esakal | हुश्श झाला एकदाचा विद्यापीठाचा "सेल्फ स्टडी रिपोर्ट', नॅककडे १५ ऑक्टोबरला पाठविणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विद्यापीठातील गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी नॅकचे मूल्यांकन करण्यात येते. यापूर्वी कुलगुरू डॉ. सि.प. काणे हे इंटरनल क्वॉलीटी एश्‍श्‍युरन्स सेलचे (आयक्‍युएसी) प्रमुख असताना, त्यांनीच हा अहवाल सादर केला होता. यावर्षी डिसेंबर महिन्यात "नॅक' मूल्यांकनासाठी समिती येणार असल्याने मार्चमधील अर्थसंकल्पात तयारीच्या दृष्टीने बरीच भरीव तरतूद करण्यात आली.

हुश्श झाला एकदाचा विद्यापीठाचा "सेल्फ स्टडी रिपोर्ट', नॅककडे १५ ऑक्टोबरला पाठविणार

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला गेल्यावेळी नॅकचा "अ' दर्जा मिळाला होता. त्यासाठी मिळालेल्या प्रमाणपत्राची मुदत डिसेंबरपर्यंत होती. मात्र, नियमाप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने ‘सेल्फ स्टडी रिपोर्ट' पाठविणे आवश्‍यक असताना, हा रिपोर्ट नॅककडे अद्यापही पाठविण्यात आलेला नाही. एप्रिलमध्येच विद्यापीठाचा दर्जा संपला आहे. मात्र, आता १५ ऑक्टोबरपर्यंत "सेल्फ स्टडी रिपोर्ट' पाठविण्यात येणार आहे.

विद्यापीठातील गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी नॅकचे मूल्यांकन करण्यात येते. यापूर्वी कुलगुरू डॉ. सि.प. काणे हे इंटरनल क्वॉलीटी एश्‍श्‍युरन्स सेलचे (आयक्‍युएसी) प्रमुख असताना, त्यांनीच हा अहवाल सादर केला होता. यावर्षी डिसेंबर महिन्यात "नॅक' मूल्यांकनासाठी समिती येणार असल्याने मार्चमधील अर्थसंकल्पात तयारीच्या दृष्टीने बरीच भरीव तरतूद करण्यात आली. या तरतूदीतून "नॅक'चा ग्रेडस सुधारण्यासाठी बराच मोठा संकल्प करण्यात आला. त्यादृष्टीने आयक्‍युएससी सेलचे प्रमुखांना निर्देशही देण्यात आले.

तंत्रज्ञानाची कमाल! आता कोरोनावर वॉच ठेवणार कॅमेरा

मात्र, त्यावेळी सहा महिन्यांपूर्वी नॅकसाठी आवश्‍यक असलेला "सेल्फ स्टडी रिपोर्ट' तयार करण्यात विद्यापीठ अपयशी ठरले. "नॅक' मूल्यांकन केले नसल्यास विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग आणि "रूसा'कडून मिळणाऱ्या निधी थांबविण्यात येणार होता. मात्र, मार्चपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नॅकद्वारे मूल्यांकनासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे आता विद्यापीठाकडून १५ ऑक्टोबरला "सेल्फ स्टडी रिपोर्ट' पाठविण्यात येणार आहे. यानंतर डिसेंबर महिन्यात नॅकद्वारे मूल्यांकन होण्याची शक्यता आहे.

अहवालास लागला बराच कालावधी
"नॅक' अहवाल तयार करण्याची जबाबदारी पूर्णत : "इंटरर्नल क्वॉलिटी एश्‍शुरन्स सेल'वर (आयक्‍युएसी) आहे. आतापर्यंत विभागाकडून त्यांना माहिती मिळविता आली नसल्यानेच अहवाल तयार झाला नसल्याचे समजते. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच इतका कालावधी निघून गेल्यावरही नॅकसाठी अहवाल तयार झाला नव्हता. त्यामुळे आयक्‍युएससीच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत होता.

loading image
go to top