esakal | छत्तीसगडमधील मोठ्या अधिकाऱ्याची नागपूरमधील लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या

बोलून बातमी शोधा

A senior officer from Chhattisgarh committed suicide by hanging himself in a lodge in Nagpur

कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत.

छत्तीसगडमधील मोठ्या अधिकाऱ्याची नागपूरमधील लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी नागपुरात आत्महत्या केली. राजेश श्रीवास्तव असे अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी खोलीचे दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सेलफोस नावाचे विषारी औषधाचे पाकीट मिळाले आहे. तेच प्राशान करून राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केयी असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बदलीमुळे ते तणावात होते अशी प्राथमिक माहिती आहे.

राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक म्हणून काम पाहत होते. एक मार्चला ते रायपूरमधील कोषागार संचालनालयातील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे साडेअकरा वाजता पत्नीने त्यांना सोडले होते. मात्र, राजेश श्रीवास्तव तिथे जास्त वेळ थांबले नाही आणि अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून चाळीस मिनिटांना ते कोषागार सांचालनालयातून बाहेर पडले.

अधिक माहितीसाठी - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत. रायपूरच्या कोषागार संचालनालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

नागपुरात दोन मार्चला राजेश श्रीवास्तव यांनी नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुय्यम दर्जाच्या पूजा लॉजमध्ये खोली घेतली. दोन मार्चला त्यांचे वर्तन सामान्य होते. तीन मार्चला सकाळी दहा वाजता ते लॉजच्या बाहेर ही गेले होते. थोड्याच वेळात परतले आणि नंतर सायंकापर्यंत दार उघडले नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.