Women Wealth : स्त्रीधनासाठी विभक्त महिला न्यायालयात; घटस्फोटानंतरही हक्काच्या वस्तूंवर दावा

‘स्त्रीधन’ म्हणजे केवळ वस्तूच नसून यासोबत तिचे भावनिक बंधही जुळलेले असतात. त्यामुळे, लग्नानंतर फारकत घेतल्यानंतर फक्त संपत्तीसाठीच नव्हे तर दागदागिन्यांतही महिलेचा जीव अडकलेला असतो.
Women Wealth
Women WealthSakal
Summary

‘स्त्रीधन’ म्हणजे केवळ वस्तूच नसून यासोबत तिचे भावनिक बंधही जुळलेले असतात. त्यामुळे, लग्नानंतर फारकत घेतल्यानंतर फक्त संपत्तीसाठीच नव्हे तर दागदागिन्यांतही महिलेचा जीव अडकलेला असतो.

नागपूर - ‘स्त्रीधन’ म्हणजे केवळ वस्तूच नसून यासोबत तिचे भावनिक बंधही जुळलेले असतात. त्यामुळे, लग्नानंतर फारकत घेतल्यानंतर फक्त संपत्तीसाठीच नव्हे तर दागदागिन्यांतही महिलेचा जीव अडकलेला असतो. अशा विभक्त महिला कौटुंबिक न्यायालयात धाव घेत स्त्रीधनावर हक्क सांगत आहेत. पुरुषांचा वाढलेला व्यावहारिकपणा आणि महिलांमध्ये हक्काबाबत झालेल्या जनजागृतीनंतर न्यायालयात अशी प्रकरणे दाखल होत आहेत.

हिंदू धर्मात स्त्रीधनाला विशेष महत्त्व आहे. महिलेला लग्नामध्ये मिळालेल्या प्रत्येक वस्तूवर तिचा अधिकार असतो. विभक्त झालेले जोडपे परस्पर सहमतीने वेगळे झाले तरी महिलेचा जीव हक्काच्या स्त्रीधनासाठी कासावीस झालेला असतो. त्यामुळे, वैवाहिक जीवनातून ओढाताण न करता दोघांच्या सहमतीने घटस्फोट घेतल्यानंतरही केवळ स्त्रीधन परत मिळावे म्हणून अनेक विभक्त महिला न्यायालयात धाव घेतात.

काही प्रकरणांमध्ये परस्पर तोडगा निघाल्यानंतर मुलाकडील या वस्तू मुलीच्या घरी परस्पर पोहोचविल्या जातात. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी वस्तूवर आक्षेप घेतल्यास किंवा तोडगा निघत नसल्यास या वस्तू न्यायालयात आणल्या जातात. दहा दिवसांमधून एकदा असे प्रकार न्यायालयामध्ये दृष्टीस पडत आहेत.

अहेरातील वस्तू न्यायालयात

नुकत्याच एका प्रकरणात लग्नात आहेरात दिलेल्या महागड्या वस्तू विभक्त महिलेला परत देण्याची वेळ वरपक्षावर आली. या महिलेने लग्नात दिलेल्या सर्व वस्तूंवर दावा दाखल केला. मात्र, प्रकरणाच्या निकालाला बऱ्याच वर्षांचा अवधी लागल्याने यातील काही वस्तू नादुरुस्त अन्‌ पूर्वीप्रमाणे नव्या राहिल्या नाही. यावर या महिलेने आक्षेप घेत लग्नात दिल्या त्याच स्थितीत वस्तू परत करण्याचा आग्रह मुलाच्या कुटुंबाकडे धरला. मुलाच्या कुटुबीयांनी आणलेल्या वस्तू न्यायालयाच्या आवारात तोवर तशाच पडून होत्या. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने वस्तूंच्या दुरुस्तीसाठी पैसे देण्याचे आदेश दिले आणि अशा क्लिष्ट प्रकरणावर तोडगा काढला.

विभक्त झालेल्या जोडप्याच्या प्रकरणात संपूर्ण कुटुंबीय मानसिक दडपणात असतात. त्यामुळे, प्रकरण थेट न्यायालयासमक्ष जाऊ नये म्हणून समुपदेशक मनधरणी करतात. यामधील ‘स्त्रीधना’ बाबतची प्रकरणे सामंजस्याने हाताळावी लागतात.

- डॉ. स्मिता जोशी, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com