एका चुकीतून आवळतोय ‘सेक्सटॉर्शन'चा फास! 'या' गोष्टींमुळे धोका

Social Media
Social MediaSakal

नागपूर : सोशल मीडियावरील (social media) मैत्री आता आणखीच धोकादायक ठरत असून अनेकजण एकमेकांबद्दल कळत-नकळत तयार होणारे आकर्षणातून नवे संकट ओढवून घेत असल्याचे दिसून येत आहे. एकाकीपणा घालविण्यासाठी सुरू केलेल्या चॅटिंगचा प्रवास व्हीडीओ कॉलपर्यंत पोहोचत असून आभासी शारिरीक समाधानाची मागणी वाढत आहे. विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशनचा (video recording apps) वापर करून संभाषण रेकॉर्ड केले जाते, यातूनच स्त्री किंवा पुरुषांभोवती सेक्सटॉर्शनचा (sextorsion through social media) फास आवळला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. (sextorsion cases increase through social media)

Social Media
चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सध्या सोशल मीडियावर फेक आयडी तयार करून फसवणुकीच्या घटनांना उत आला आहे. फेसबुकवर युजरच्या पोस्टवरून त्याचा स्वभाव, गरजा, मानसिकता, मित्र, परिवार, सामाजिक प्रतिमा याचा अभ्यास केला जात आहे. त्यातून युजरचे कमकुवत दुवे शोधले जात असून त्यानंतर फेक आयडीद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. एकदा पुरुष किंवा स्त्रीकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली की दररोज चॅटिंग, पुढे अश्लिल चॅट व नंतर व्हिडीओ कॉलसाठी आग्रह धरला जातो. त्यानंतर पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी स्त्री किंवा स्त्रीयांना जाळ्यात ओढण्यासाठी पुरुष गुन्हेगारांकडून भावनिक प्रयत्न केले जाते. एवढेच नव्हे पुरुष गुन्हेगारच बरेचदा व्हाईस मॉड्यूलर सॉफ्टवेयर वापरून महिलांच्या आवाजात ऑडिओ कॉलवर संभाषण करतात. लैंगिक मुद्यांवर व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू करत थेट आभासी शारीरिक समाधानासाठी तयार केले जाते. विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशन, दुसरा मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रिन रेकॉर्डिंग अप्लिकेशनचा वापर करून ते रेकॉर्ड केले जाते. फेक वेबसाईट तयार करून या रेकॉर्ड केलेल्या क्लिप तात्पुरत्या स्वरुपात त्यावर टाकून त्याची लिंक दाखवून ब्लॅकमेल केले जात आहे. प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याने कुणीही याबाबत ब्र शब्दही काढत नसल्याची चर्चा आहे.

केवळ महिला नव्हे तर कमावते असल्याने पुरुषही मोठ्या संख्येने ‘सेक्सटॉर्शन’चे बळी ठरत आहेत. ब्लॅकमेलिंगमुळे पैसे तर जातातच पण प्रतिष्ठाही धुळीस मिळण्याची शक्यता आहे. महिलांना या गुन्हेगारांकडून चक्क वेश्या व्यवसायाकडे ढकलले जाण्याची भीती आहे. प्रतिष्ठेच्या भीतीने पोलिसांकडे कुणीही जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सावधगिरी बाळगणे हाच एक पर्याय आहे.
- अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com