Shakuntala Railways : स्वतंत्र देशाची ‘शकुंतला’ गुलामगिरीतच

अचलपूरचे रेल बचाव जनआंदोलन पोहोचले २२ व्या टप्प्यात
Shakuntala Railways central govt Achalpur rail rescue mass movement reached 22nd stage vidarbha
Shakuntala Railways central govt Achalpur rail rescue mass movement reached 22nd stage vidarbhaSakal

अचलपूर : हिम्मत न हार, कर इंतजार, ये रात जा रही हैं, वो सुबह आ रही हैं, गाडी बुला रही हैं... या गीताप्रमाणे शकुंतला रेल्वेसाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती आंदोलन करीत आहे. आजपर्यंत २१ वेळा विविध प्रकारची आंदोलने करून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापही सरकार गाढ झोपेत आहे. त्यामुळे हे जनआंदोलन २२ व्या टप्प्यात पोहोचले आहे.

इंग्रजांनी पारतंत्र्यात सुरू केलेली शकुंतला रेल्वे स्वतंत्र भारतात मात्र बंद केली गेली. यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? अशी तीव्र भावना व्यक्त करीत शकुंतला सुरू झालीच पाहिजे, असे नारे दिल्या गेले. कोणत्याही परिस्थितीत शकुंतला सुरू झालीच पाहिजे, यासाठी आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचे रेल बचाव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी माहेर फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, संस्कार भारती, आदिवासी पर्यावरण संघटन, वीर भगतसिंग दल, शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, संतोष नरेडी, ज्ञानेश माहुले, दीपा तायडे, अनिल पिंपळे, महेंद्र राठी, रामदास मसने, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, पंकज गुप्ता, नीलेश गावंडे, श्री. खंडेलवाल,

संदीप घिया, राजेंद्र मुंदे, मुरलीधर ठाकरे, शारदा उईके, सुजाता तायडे, दादा गावंडे, चंदेले, चिन्मय चंदेल, विजय गोंडचवर, विनोद मिश्रा यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अचलपूर येथील रेल्वेस्टेशनवर माजी सैनिक ज्ञानेश्वर भुजबळ तथा विजय खरपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

२०१७ पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. आजपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनांच्या प्रती राष्ट्रपती, केंद्रीय रेल मंत्री यांना पाठविण्यात आल्या. मात्र अद्यापही सरकार झोपेत आहे. त्यांना जागे करण्यासाठी पुढील आंदोलन आता उग्ररूप घेईल.

-योगेश खानझोडे, रेल बचाव समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com