शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Latest News : शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द

यवतमाळ : माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवार (ता. १९) व रविवारी (ता. २०) दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे होते. हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक आशिष मानकर यांनी ही माहिती दिली.

आगामी वर्षात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रणधुमाळी होत्र आहे. या निवडणुकींना समोर जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात उतरे आहे. पक्षसंघटन बांधणी सोबतच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शरद पवार जिल्ह्यात येणार आहे.

हेही वाचा: शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला टोला; म्हणाले...

शनिवारी (ता. २०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार होते. दौऱ्या संदर्भातील तयारी अंतिम टप्पात आली होती. ते सध्या नागपूर येथे आहे. मात्र, शुक्रवारी व शनिवारी पवारांचा दौरा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, दौरा रद्द झाल्याने निराशा पसरली आहे.

जिल्ह्यात बोंडअळी तसेच फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाले होते. त्यावेळी पवार यांनी जिल्हा दौरा करीत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी शेतकरी संकटात आहे. अशास्थितीत पवारांचा दौरा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात होता. शेतकऱ्यांसोबतच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्याशी संवाद साधणार होते.

हेही वाचा: गडकरींची स्तुती तर फडणवीसांना टोला; निषेध रॅलीने वातावरण खराब

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना ‘बूस्ट’ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा होता. जिल्ह्यात पुसद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद फार नाही. आगामी नगरपंचायत, पालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत पक्षांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती. मात्र, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यातील दौरा रद्द करण्यात आला आहे.

loading image
go to top