नागपूर : दोन आंदोलनांमुळे शिवसैनिकांची दमछाक

एकीकडे जिल्हा तर दुसरीकडे शहरप्रमुख : गटबाजी चव्हाट्यावर
Shiv Sainiks suffer due two agitations ED on Sanjay Raut treason against Kirit Somaiya nagpur
Shiv Sainiks suffer due two agitations ED on Sanjay Raut treason against Kirit Somaiya nagpur sakal

नागपूर : शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात तसेच किरीट सोमय्यांवर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी शहरात आंदोलन करण्यात आले. मात्र जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केल्याने शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. दुसरीकडे एकाच दिवशी प्रचंड गर्मीत दोन आंदोलनात सहभागी व्हावे लागल्याने शिवसैनिकांचीसुद्धा चांगलीच दमछाक झाली.

जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी एक वाजता संविधान चौकात आंदोलन करण्याचे ठरविले होते. तसेच मेसेजही शिवसैनिकांना धाडण्यात आले होते. दुसरीकडे शिवसेनेचे शहर महानगर प्रमुख नितीन तिवारी यांनी संविधान चौकातच पाच वाजता आंदोलन असल्याचे कळविले. त्यामुळे कोणाच्या आंदोलनात जायचे असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला होता. गटबाजीचा शिक्का लागू नये म्हणून काही शिवसैनिक दोन्ही आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र एकाच दिवशी दोन आंदोलनामुळे शिवसैनिकांची चांगलीच दमछाक झाली.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यकारिणीमुळे जुने शिवसैनिक नाराज होते. त्यांच्या कार्यशैलीच्या वारंवार तक्रारी केल्या जात होते. त्यामुळे शिवसेनेच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी जुने शिवसैनिक म्हणून माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना जिल्हा प्रमुख केले. त्यामुळे शिवसेनेते जुन्या-नव्यांचा समन्वय साधाला जाईल अशी आशा व्यक्त केली जात होती. कार्यकारिणीच्या विस्तारानंतर मात्र आता वेगळेच चित्र बघायला मिळाले.

मुंबईतून आंदोलनाचे आदेश आल्यानंतर जिल्हा प्रमुख आणि शहरप्रमुखांनी एकत्रित आंदोलनाची रुपरेषा ठरवणे अपेक्षित होते. संपर्क प्रमुख या नात्याने दुष्यंत चतुर्वेदी यांनीसुद्धा पुढाकार घेतला नाही. जिल्हा आणि शहर प्रमुख्यांनी एकमेकांसोबत संपर्क साधला नाही. आपआपल्या अधिकारात आंदोलनाच्या वेळा निश्चित केल्या. त्यामुळे जिल्हा प्रमुख कुमेरियांचे आंदोलन दुपारी एक वाजता तर शहर प्रमुख नितीन तिवारी यांचे आंदोलन सायंकाळी पाच वाजता झाले. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. यात शिवसैनिकांची मात्र सँडविच झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com