जि.प. निवडणुकीत सेनेची कोणासोबत युती? स्थानिक आमदारांना विचारणा

shivsena
shivsenashivsena

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या (nagpur zp byelection) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) राहायचे की स्वबळावर लढायचे यासाठी शिवसेनेच्यावतीने (shivsena) मत मागविण्यात आले आहे. स्थानिक आमदारांना याबाबत विचारणा करण्यात आली असून तत्काळ अभिप्राय कळवण्याचा निरोप पाठविण्यात आला आहे. (shivsena ask to mla for zp election alliance)

shivsena
जि.प. निवडणुका पुढे ढकलण्यास आयोगाचा नकार? सरकारकडे उरले दोन दिवस

ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या राखीव सर्कलमधून लढलेल्या सर्व जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण १६ जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये पोट निवडणूक जाहीर झाली आहे. हे सर्व सर्कल सर्वांसाठी खुले झाले आहेत. मात्र, ओबीसी समाजाचा रोष थोपवण्यासाठी भाजपने सर्व जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी एकत्रित लढली होती. काही सर्कल त्यास अपवाद होते. तसेच रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना स्वबळावर लढली होती. यापैकी एक सदस्य निवडून आला. आणखी एक सदस्य दुसऱ्या क्रमांकावर होता. महाविकास आघाडीच्या प्रयोगाने भाजपला विरोधात बसावे लागले. निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेने सावध पवित्रा घेतला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. शिवाय आता निवडणुकीसाठी मोठी रसदही उपलब्ध होण्याची आशा शिवसैनिकांना आहे.

शिवसेनेला संधी -

सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये शिवसेनेचा एकही सदस्य नाही. त्यामुळे संख्याबळ वाढवण्याची चांगली संधी सेनेकडे आहे. एकूण १६ सदस्यांपैकी काँग्रेसचे ७, राष्ट्रवादीचे ४, भाजपचे ४ आणि शेतकरी संघटनेच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत पाच उमेदवार शिवसेनेचे होते. त्यांपैकी फक्त एक सदस्य निवडून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com