esakal | कोविशिल्डचा मुबलक साठा; पण फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनाच मिळतेय कोव्हॅक्सीन

बोलून बातमी शोधा

corona vaccine

कोविशिल्डचा मुबलक साठा; पण फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनाच मिळतेय कोव्हॅक्सीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : १६ जानेवारीपासून लसीकरणादरम्यान कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. कोविशिल्डचा मुबलक साठा उपलब्ध होत असताना कोव्हॅक्सिनचा मात्र तुटवडा आहे. मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच लस दिली जात आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे, तर कोविशिल्डच्या नागपूर जिल्ह्यासाठी ५२ हजार ८०० डोज नुकतेच प्राप्त झाले.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन वेगवेगळ्या लसी देण्यात येत असताना कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांना मात्र ही लस मिळत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. नागपुरात गेल्या १५ दिवसांपासून कोव्हॅक्सिनची कमतरता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लसीकरण केंद्र दोन वेळा बंद करण्यात आले होते. प्रथम डोस मागणाऱ्यांना परत पाठवण्यात येत आहे. विशेष असे की, दुसऱ्या डोसचे लसीकरण येत्या दोन तीन दिवसांत पूर्ण होईल. मात्र, त्यानंतरही कोव्हॅक्सिन पोहोचले नाही. नागपुरात ५२ हजारांसह नागपूर विभागासाठी ८५ हजार ५०० डोस आले आहेत.

विदर्भासाठी कोविशिल्डचे १ लाख ३८ हजार डोस

  • नागपूर -५२ हजार

  • अकोला -७१००

  • अमरावती-१२९००

  • बुलढाणा-११५००

  • यवतमाळ-२१०००

  • चंद्रपूर -८१००

  • गडचिरोली-१००००

  • वर्धा -१४६००