Nagpur : किल्लेदार प्रतिष्ठानचा सिंहगड किल्ला प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sinhagad

किल्लेदार प्रतिष्ठानचा सिंहगड किल्ला प्रथम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीपावलीच्या पर्वात आयोजित शिववैभव किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. शिवकिल्ले गटात सक्करदरा येथील किल्लेदार प्रतिष्ठानच्या किल्ले सिंहगडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलदूर्ग गटात किल्ले पद्मदूर्गने बाजी मारली असून वैदर्भीय गटात किल्ले चंद्रपूरने बाजी मारली. १९८६ पासून या स्पर्धेचे आयोजन केल्या जात आहे. स्पर्धेचे आयोजक रमेश सातपुते यांनी हा निकाल जाहीर केला आहे.

गडदूर्ग, जलदूर्ग, वैदर्भीय किल्ले अशा तीन गटात ही स्पर्धा झाली. तीनही गटातील विजेत्यांना एक लाख रूपयांचे पुरस्कार नगदी स्वरूपात दिले जाणार आहेत. येत्या जानेवारीमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. गडदूर्ग गटात अभिषेक कळमकर निर्मित किल्ले रायगड दुसरा तर अश्विन निमजे यांचा राजगड तिसरा आला.

याच गटात तोरणा(पुष्कर दहासहस्त्र), लोहगड(रमेश सावरकर), शिवनेरी(शिवराय ग्रुप,अमेय किल्ला प्रतिष्ठान), रायगड(स्वराज्य किल्ला ग्रुप),रोहिडा(सार्थक पावडे), अजिंक्य तारा(अजय इंगळे), पन्हाळगड(भवानी ग्रुप), सिंहगड(शुभम तारेकर) यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत.

जलदूर्ग गटात पद्मदूर्गनेच पहिले तिन्ही क्रमांक पटकावले. यामध्ये विभव साठे पहिला,निखिल शेंडेचा दुसरा तर शिवगौरव प्रतिष्ठानने तिसरा क्रमांक पटकावला. याच गटात सिंधुदुर्ग(आनंद जाधव, रोशन पौनिकर,छावा प्रतिष्ठान),जंजिरा(प्रणय भांगे), पद्मदूर्ग(वैभव दूर्ग प्रतिष्ठान), विजयदुर्ग(मंदार उट्टलवार,तेजस अकर्ते) किल्ल्यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत

हेही वाचा: कामगार संहिता : भविष्यवेधी पाऊल

वैदर्भीय किल्ले गटात मंगेश बारसागडे किल्ले चंद्रपूरने प्रथम,ऋग्वेद तराळे यांच्या बाळापूरने द्वितीय तर अष्टक ग्रुपच्या किल्ले नगरधनने तिसरा क्रमांक पटकावला.

मावळे किल्‍ला ग्रुप, स्‍वरनिम तरवरकर, श्‍यामभवी देव, सचिन भापकर, अनुश्री घीसाड,मूक बधिर औद्यौगिक संस्था,शंकरनगर, इसेन्स इंटरनॅशनल स्कूल नागलवाडी,राही पब्लिक स्कूल यांना विशेष उल्‍लेखनीय पुरस्‍काराने गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून दुर्ग अभ्यासक प्रविण योगी, आचार्य दत्तात्रय सोनेगांवकर व अतुल गुरू यांनी काम पाहिले. उपराजधानीत ४० तास चाललेल्या परीक्षण यात्रेत आशीष मस्‍के, छायाचित्रकार रोशन घागरे, चेतन ठाकरे व आनंद कोटेवार सहभागी झाले होते.

काल्‍पनिक किल्‍ले गट

प्रथम पुरस्‍कार ; रविंद्र संगीतराव

व्‍दितीय पुरस्‍कार ; प्रकाश चन्‍ने

तृतीय पुरस्‍कार : एमकेएच संचेती पब्‍लिक स्‍कूल

महिला स्‍पर्धेक विशेष पुरस्‍कार

किल्‍ले राजगड ; रंजना जोशी

किल्‍ले सज्‍जनगड ; राधा गद्रे

किल्‍ले सुवर्णदुर्ग ; धनश्री भोयर

loading image
go to top