रक्षाबंधनाला बहिणीची भावाला मौल्यवान भेट! अखेर मरणाच्या दारातून आणलेच परत

luche family
luche familye sakal

वेलतूर (जि. नागपूर) : ‘वेड्या बहिणीची वेडी माया, असे म्हटले जाते. असा हा लाडका भाऊरायाच संकटात सापडला तर? त्याच्या जगण्या-मरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असेल तर? मात्र, मन सुन्न करणारा प्रश्न किडणीदानाने (kidney donation) दोघ्या बहिणींनी सोडवून आपल्या एकमेव लाडक्या धाकट्या भावाला मरणाच्या दाढेतून ओढत आणले. बहिणीच्या बंधूप्रेमाची प्रचिती देणारी घटना रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan 2021) तोंडावर घडली असल्याने सर्वत्र चर्चा आहे.

luche family
जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्यालाच विकले, विकत घेणाऱ्याने मेंढीपालनाला जुंपले

रक्षाबंधन सणासमोर घडलेल्या या प्रेरणादायी प्रसंगाने तालुका बंधूप्रेमाचा अनोखा क्षण अनुभवतो आहे. मांढळ येथील लुचे कुटुंबावर ओढवलेला हा प्रसंग आणि त्याअनुषंगाने घडलेला घटनाक्रम हृदय पिळवटून टाकणारा आहे. नूतन हायस्कूल वेलतूर येथे लिपीक म्हणून कार्यरत असलेले गजानन लुचे (वय३६) पाच बहिणींनंतर जन्माला आलेले अपत्य, त्यामुळे त्यांच्यावर साऱ्यांचा जीव. बहिणी लग्न होऊन सासरी कुटुंबात स्थिरावल्या. भाऊही शिकून नोकरीस लागला. तोही लग्न होऊन संसारात गुंतला. संसारवेल फुलली. सारं ‘ऑल इज वेल’ असताना तब्येतीची थोडी कुरबूर सुरू झाली आणि निदान झालं की किडणी निकामी झाली.

औषधोपचार केला आणि परत आकाश कोसळलं. संसर्ग होऊन दुसरीही किडणी निकामी झाली असल्याचे डॉक्टरांकडून कळले. मग वैद्यकीय सल्ल्याने किडणी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. पण किडणीदात्यांची सोय होईना. सारेच प्रयत्न निष्फळ ठरत होते. प्रकृती अधिकच ढासळत होती. अखेर भावाची ढासळलेली प्रकृती बघून बंधूप्रेम जागे होऊन बहिणींनी पुढाकार घेतला व त्याला राखीची अनोखी भेट देण्यासाठी त्या सरसावल्या. लिलाबाई गोविंदा नवघरे (वय वर्षे 53) आणि उषा केशव लोहारे (वय वर्षे 44) या दोन्ही बहिणींनी लाडक्या भावाला किडणी दान केली. आठवडाभरापूर्वी त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही बहिणींसह भाऊही सुरक्षित असून वेड्या बहिणीच्या या वेड्या मायेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com